मुंबई - अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या कॉमिक अंदाज अन् उत्तम अदाकारीनं ओळखली जाते. अलीकडेच तिचा भूल भुलैया ३ सिनेमा रिलीज झाला त्यातील विद्या बालनच्या भूमिकेला चाहत्यांनी पसंती दिली पण तुम्हाला माहिती आहे का, विद्या बालन हीने एका बिस्किट पॅकेटसाठी एका हॉटेलबाहेर भीक मागायलाही तयार झाली होती. अभिनेत्रीने एका प्रमोशनवेळी हा मजेदार किस्सा ऐकवला, जे ऐकल्यावर तुम्हीही हैराण व्हाल.
विद्या बालन नीयत या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होती. त्यावेळी तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, एका बिस्किट पॅकेटसाठी फाईव्ह स्टार हॉटेलच्या बाहेर भीक मागायलाही मी तयार झाली होती. आमचा एक म्युझिकल ग्रुप असायचा, आम्ही दरवर्षी क्लासिकल म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करायचो. या आयोजनाच्या समितीत मी वॉलेंटियर होती. कॉन्सर्ट रात्री उशीरापर्यंत चालायचा, त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही मित्र मैत्रिणी नरिमन पॉईंटला फिरायला जात होतो. त्यावेळी माझ्या मित्रांनी मला चॅलेंज दिले होते असं तिने सांगितले.
हे चॅलेंज असं होतं, Oberoi he Palms च्या कॉफी शॉपच्या गेटवर जाऊन तिथे काहीतरी खाण्यासाठी मागायचे, जर मी हे चॅलेंज जिंकलं तर मला माझ्या आवडीचं बिस्किट पॅकेट दिले जाईल असं मित्रांनी सांगितले. त्यानंतर मी तिथे गेली आणि कॉफी शॉप गेट बाहेर दरवाजा खटखट करायला लागली. मी तिथे खाण्यासाठी काहीतरी मागू लागली. मी माझा अभिनय सुरूच ठेवला होता परंतु काही तरी जास्तच होतंय असं मित्रांना वाटले म्हणून त्यांनी मला परत बोलावले. त्यानंतर मी हे चॅलेंज जिंकले आणि मित्रांकडून बिस्किट पॅकेट घेण्यास यशस्वी ठरले. तेव्हा मला खूप आनंद झाला होता असं अभिनेत्री विद्या बालनने सांगितले होते.