Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक आर्यन नव्हे तर 'या' अभिनेत्रीने 'भूल भूलैय्या ३'मध्ये साकारली 'मंजुलिका'! तोंडावर मास्क लावून सर्वांना घाबरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:51 IST

'भूल भूलैय्या ३'ची सध्या चर्चा असून सिनेमात खऱ्या मंजुलिकाची भूमिका कोणी साकारली याचा उलगडा झालाय. (bhool bhulaiyya 3)

कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला 'भूल भूलैय्या ३' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात कार्तिकने पुन्हा एकदा रूहबाबा बनून सर्वांना हसवलं. याशिवाय सिनेमाच्या कथेत शेवटच्या ट्विस्टमध्ये कार्तिकने सर्वांना घाबरवलं. याशिवाय अनेकांना वाटत होतं सिनेमात मास्क लावून जी मंंजुलिका सर्वांना घाबरवते, तो कार्तिक आर्यनच आहे. परंतु मास्कमागे एका अभिनेत्रीने 'भूल भूलैय्या ३' मध्ये काम केलं असून याविषयी उलगडा झालाय. 

या अभिनेत्रीने साकारली 'मंजुलिका'

अनेकांना वाटलं मास्कमागे कार्तिक आर्यनने मंजुलिका बनून सर्वांना घाबरवलं. परंतु तो कार्तिक आर्यन नव्हता तर त्या मास्कमागे एक अभिनेत्री होती. तिचं नाव पिया सोनी. पियाने मालिकेच्या सेटवरील शूटिंगचे आणि मेकअप करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत. याशिवाय पियाने  'भूल भूलैय्या ३'मधील कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षितसोबत फोटो शूट केलं. अशाप्रकारे अनेकांना पियाने सिनेमात मंजुलिकाची भूमिका साकारली असल्याचं कळताच सुखद धक्का बसलाय. 

'भूल भूलैय्या ३'सोबत 'सिंघम अगेन'ची चर्चा

'भूल भूलैय्या ३' सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाला 'सिंघम अगेन'सोबत बॉक्स ऑफिसवर सामना करावा लागला. १ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहुर्तावर दोन्ही सिनेमे रिलीज झाले. एकूणच दिवाळीला लागून येणाऱ्या सुट्ट्यांचा 'भूल भूलैय्या ३'ला चांगलाच फायदा झालाय. या सिनेमाने २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. 'सिंघम अगेन'ची तगडी टक्कर असूनही 'भूल भूलैय्या ३'ला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :कार्तिक आर्यनविद्या बालनमाधुरी दिक्षित