Join us

कोण आहे अल्लू अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील श्रीवल्ली?, आहे इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 10:13 IST

Allu Arjun wife: सध्या अल्लू अर्जुन त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा २: द रुल'च्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटात अभिनेता पुन्हा एकदा पुष्पा ही त्याची दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे.

सध्या अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा २: द रुल' (Pushpa The Rule)च्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटात अभिनेता पुन्हा एकदा पुष्पा ही त्याची दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. यासोबतच रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने या चित्रपटात त्याची पत्नी श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे, पण तुम्हाला माहित आहे का की या अभिनेत्याचा खऱ्या आयुष्यातला श्रीवल्ली कोण आहे? त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव अल्लू स्नेहा रेड्डी (Allu Sneha Reddy) आहे. ती सौंदर्यात अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. चला तर मग जाणून घेऊयात स्नेहा रेड्डीच्या नेटवर्थबद्दल.

अल्लू अर्जुनची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी हैदराबादच्या एका उच्चवर्गीय कुटुंबातील आहे, तिचे वडील कंचरला चंद्रशेखर रेड्डी हे व्यापारी आहेत आणि तेलंगणाच्या राजधानीतील एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्नेहा रेड्डीने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथून उच्च शिक्षण पूर्ण केले. तिथे तिने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवली. पदवी पूर्ण केल्यानंतर, ती भारतात आला आणि तिने आपल्या वडिलांच्या संस्थेत शैक्षणिक आणि प्लेसमेंट सेल म्हणून काम केले. 

अल्लू अर्जुन-स्नेहा रेड्डीची लव्हस्टोरीअल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांची पहिली भेट एका लग्नात झाली होती. तिथे पहिल्या भेटीतच अभिनेता स्नेहाच्या प्रेमात पडला, त्यानंतर २०१० मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि त्यानंतर एक वर्षानंतर २०११ मध्ये दोघांनी लग्न केले. २०१४ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे अल्लू अयानचे स्वागत केले आणि त्यानंतर २०१६ मध्ये स्नेहाने मुलगी अल्लू अर्हाला जन्म दिला.

स्नेहा रेड्डीची नेटवर्थस्नेहा एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिने शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप नाव कमावले आहे. तिच्या यशस्वी व्यवसायामुळे स्नेहा आज कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय करत आहे. स्नेहाची एकूण संपत्ती ४२ कोटी रुपये आहे. सेलिब्रिटी असण्यासोबतच स्नेहा 'स्टुडिओ पिकाबू' नावाचा व्यवसायही चालवते. हा ऑनलाइन फोटो स्टुडिओ आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पा