Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 10:01 IST

विद्या बालनच्या हजरजबाबीपणाचं सगळीकडे कौतुक होत असून तिच्या नृत्य अदाकारीने सर्वांना मंत्रमुग्ध केलंय

सध्या 'भूल भूलैय्या ३'ची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यन यांची प्रमुख भूमिका आहे. 'भूल भूलैय्या ३'चे प्रमोशनल इव्हेंट सध्या जोरात सुरु आहेत. सिनेमातील मुख्य स्टारकास्ट या इव्हेंटला हजेरी लावताना दिसतेय. अशातच 'भूल भूलैय्या ३'मधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गाणं 'आमी जे तोमार' काल रिलीज करण्यात आलं. यावेळी माधुरी आणि विद्या या दोघींनी स्वतः नृत्याची अदाकारी दाखवत सर्वांना मंत्रमुग्ध केलं. तेव्हा विद्या स्टेजवरच कोसळते. पुढे अभिनेत्रीच्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं. 

डान्स करताना स्टेजवर कोसळली विद्या अन् पुढे..

विद्या बालनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काल 'भूल भूलैय्या ३'मधील 'आमी जे तोमार' गाणं लॉंच झालं. यावेळी विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांनी या गाण्यावर परफॉर्म केला. त्यावेळी डान्स करताना विद्याचा पाय घसरला आणि ती स्टेजवरच कोसळली. परंतु या गोष्टीकडे जास्त न लक्ष न देता विद्याने लगेच स्वतःला सावरत पुढील डान्स स्टेप केली. विद्याने गाण्याचा आणि नृत्याचा मान राखल्याने सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

विद्या - माधुरी 'भूल भूलैय्या ३'मध्ये एकत्र

'भूल भूलैय्या'च्या पहिल्या भागात दिसलेली विद्या बालन 'भूल भूलैय्या ३'मध्ये पुन्हा एकदा भेटीला येणार असल्याने सर्वांना आनंद झालाय. विद्या बालनला पछाडलेल्या मंजुलिकासोबत कार्तिक आर्यन थेट भिडताना दिसणार आहे. याशिवाय तिच्यासोबत माधुरी दीक्षितही मंजुलिकाच्या रुपात भेटीला येणार आहे. या दिवाळीत १ नोव्हेंबरला 'भूल भूलैय्या ३' रिलीज होताना दिसणार आहे. अनीस बाझमींनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि कार्तिक आर्यन यांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.

 

टॅग्स :भूल भुलैय्याकार्तिक आर्यनविद्या बालनमाधुरी दिक्षित