Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tabu : तब्बू आडनाव का लावत नाही? यामागे दडलेलं आहे एक दु:ख...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 11:48 IST

Tabu: तब्बूला तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलणं आवडत नाही आणि त्यामुळे तिच्याबद्दल फारसं कोणालाच ठाऊक नाही. अनेकांना तिचं आडनाव माहित नाही. तिच्या वडिलांचं नाव ठाऊक नाही. असं का? त्यामागे एक मोठी कहाणी आहे.

अभिनेत्री तब्बू (Tabu) ही बॉलिवूडची शानदार अभिनेत्री. 1982 साली फिल्मी करिअर सुरू करणाऱ्या तब्बूने अनेक हिट सिनेमे दिलेत. तब्बूने अद्यापही लग्न केलेलं नाही, ती आपल्या नावासोबत आपलं आडनाव लावत नाही. खरं तर तिच्याबद्दल असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. पण तब्बूला तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलणं आवडत नाही आणि त्यामुळे तिच्याबद्दल फारसं कोणालाच ठाऊक नाही. अनेकांना तिचं आडनाव माहित नाही. तिच्या वडिलांचं नाव ठाऊक नाही. असं का? त्यामागे एक मोठी कहाणी आहे.

तब्बूचं आडनाव हाश्मी आहे. पण तिने कधीच हे आडनाव वापरलं नाही. सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत तब्बू स्वत: यावर बोलली होती. ‘मला कधीच माझ्या वडिलांचं नाव व त्याचं आडनाव वापरण्याची गरज वाटली नाही’, असं ती म्हणाली होती.

ती म्हणाली होती, मी माझी आई आणि आजी-आजोबा (आईचे आईवडिल) यांच्यासोबत मोठी झाले. हैदराबादेत आजी आजोबांसोबत माझं बालपण मजेत गेलं.    माझ्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर मी आजी-आजोबांसोबत राहू लागले. माझी आई एक शिक्षिका होती. त्यामुळे मी आजीसोबत जास्त वेळ घालवायची. माझे आजीआजोबा दोघंही देवाला मानायचे. धार्मिक पुस्तक वाचायचे. लहानपणी मी खूप भित्री होते. काहीच बोलायचे नाही. आज अभिनेत्री बनल्यानंतरही मी बोलू शकत नाही.’

मला कधीच वडिलांना भेटावसं वाटलं नाही...याच मुलाखतीत तब्बू तिच्या वडिलांबद्दलही बोलली होती. ‘मी 3 वर्षांची असताना माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. दुसºया पत्नीपासून त्यांना दोन मुली आहेत. मी कधीच वडिलांचं आडनाव वापरलं नाही. त्यांचं आडनाव वापरणं गरजेचं आहे, असं कधीच मला वाटलं नाही. शाळेत मी माझ्या नावापुढे फातिमा लावायचे, जे माझं मधलं नाव होतं. माझ्याकडे  वडिलांच्या कोणत्याही आठवणी नाहीत. माझी बहीण त्यांना खूप वेळा भेटली आहे. पण मला कधी त्यांना भेटावसं वाटलं नाही. मी ज्या पद्धतीने लहानाची मोठी झाले,त्याचा मला आनंद आहे.  मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे सेटल झाले आहे,’असं ती म्हणाली होती.

लवकरच तब्बूचा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याशिवाय  कुत्ते,  खुफिया आणि भोला या चित्रपटात ती दिसणार आहे. आजच ‘द क्रू’ या तिच्या नव्या सिनेमाची घोषणा झालीये. यात तिच्यासोबत करिना कपूर व क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :तब्बूबॉलिवूड