Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेखा जेव्हा एक्स गर्लफ्रेंड बनून अभिनेत्याला करत होती फोन, खूप झालं होतं भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 17:06 IST

Rekha annoyed by ex boyfriend : बॉलिवूड सेलिब्रिटीच्या या मॅगझीनने फिल्म इंडस्ट्रीतील अनेक जोड्यांना त्यांच्या साथीदारांबाबत अशी बाब विचारण्यात आली होती जी त्यांना आवडत नाही.

Rekha annoyed by ex boyfriend : रेखा तिच्या काळातील अशा बोल्ड हिरोईन्सपैकी होती जी नेहमीच तिच्या मनातील गोष्टी बिनधास्तपणे मीडियासमोर बोलत होती. तिच्या या बिनधास्त बोलण्यामुळेच तिला बोल्ड मानलं जात होतं. आपल्या याच अंदाजात एकदा रेखाने एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तिच्या 'बॉयफ्रेंड' च्या एका सवयीबाबत सांगितलं होतं, ज्याचा तिला खूप वैताग येत होता.

बॉलिवूड सेलिब्रिटीच्या या मॅगझीनने फिल्म इंडस्ट्रीतील अनेक जोड्यांना त्यांच्या साथीदारांबाबत अशी बाब विचारण्यात आली होती जी त्यांना आवडत नाही. शर्मिला टागोर, मंसूर अली खान पटौदीसहीत अनेकांनी आपल्या पार्टनर्सबाबत खुलासा केला होता. यात रेखा आणि किरण कुमार हेही होते. मॅगझीनने हे नव्हतं की, पार्टनर्समधील कोणती सवय पसंत आहे. हे विचारतं होतं की, कोणती सवय आवडत नाही.

त्यावेळी रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरची चर्चा सुरू होण्याआधी रेखा अभिनेता किरण कुमार याला डेट करत होती. हे अफेअर खूप गाजलं होतं.स्टारडस्ट मॅगझीनली जानेवारी 1975 च्या एडिशनला दिलेल्या मुलाखतीत रेखाने किरण कुमारच्या या चिढ येणाऱ्या सवयीबाबत उल्लेख केला होता. केवळ रेखाच नाही तर किरण कुमार यानेही सांगितलं होतं की, कशाप्रकारे रेखा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या आवाजाची नक्कल करून त्याला त्रास देत होती.

रेखाने सांगितलं होतं की, ती किरण कुमारच्या 'मम्‍मा बॉय' असण्याने फार परेशान होती. रेखाने या लेखात सांगितलं होतं की, 'आम्ही रात्री उशीरापर्यंत फिरण्याचा प्लान करू शकत नाही. कारण तो कोणत्याही स्थितीत 10 वाजता घरी पोहोचतो, जेणेकरून त्याला दूध पिता यावं. त्याची ही सवय मला अजिबात आवडत नव्हती. तुम्हाला नाही वाटत का की, मला जास्तीत जास्त "Mama's Boy" मिळाले आहेत.

तेच रेखाच्या सवयीबाबत किरण कुमारने सांगितलं होतं की, 'मला खूप राग येतो जेव्हा ती माझ्या एक्‍स गर्लफ्रेंडच्या आवाजाची नक्कल करून माझ्यासोबत फोनवर बोलते. आणि जेव्हा सन्मानासाठी मी प्रेमाने बोलतो तेव्हा तिला राग येतो'.

दुसरीकडे रेखा फार बिनधास्त आणि बोल्ड अशी हिरोईन होती. त्यावेळी तिने अनेक वादग्रस्त विधान समोर येत होते. रेखा केवळ एक लाइन बोलायची आणि त्यावरून अनेक अफवा पसरत होत्या. अशात किरण कुमारचे वडील अभिनेता जीवन यांना वाटत होतं की, रेखा त्यांच्या घरची सून होऊ नये. रेखाला याचा धक्का बसला होता की, वडिलांनी सांगितलं म्हणून किरणने तिला साथ दिली नाही.

टॅग्स :रेखाबॉलिवूड