Join us

'लोकं नावं ठेवतील असं कधीच वागत नाही'; तोकड्या कपड्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना मलायकाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:41 IST

Malaika arora: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मलायकाचा इंटरव्ह्यू बराच जुना असून या मुलाखतीमध्ये तिच्यासोबत अरबाज खानदेखील उपस्थित होता.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी तिच्या अफेअरमुळे तर कधी तिच्या फॅशनसेन्समुळे. सध्या मलायका तिच्या एका जुन्या इंटरव्ह्युमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने समाजात असलेल्या तिच्या प्रतिमेविषयी भाष्य केलं आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मलायकाचा इंटरव्ह्यू बराच जुना असून या मुलाखतीमध्ये तिच्यासोबत अरबाज खानदेखील उपस्थित होता. हा इंटरव्यू मलायका- अरबाज यांच्या लग्नापूर्वी घेण्यात आला होता. या मुलाखतीमध्ये मलायकाच्या फॅशनवरुन आणि एकंदरीत तिच्या बोल्डनेसवरुन अरबाजला काही प्रश्न विचारण्यात आले होते. 

'मलायका अनेकदा तोकड्या कपड्यांमध्ये वावरते किंवा अनेकदा तिच्या डिझायनर ड्रेसची चर्चा होते. तर तिचे असे कपडे पाहून तुला कधी राग येत नाही का?' असा प्रश्न अरबाजला विचारला होता. त्यावर मलायकाला हे चांगलं माहितीये की कोणती गोष्ट करावी आणि कोणती करु नये, असं अरबाज म्हणाला. त्याचीच री ओढत मलायकानेही तिचं मत मांडलं.

"लोकांनी मला नावं ठेवावीत किंवा माझ्यावर बोट उचलावं अशी कामं मी कधीच करत नाही", असं मलायका म्हणाली. दरम्यान, अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट होऊन बराच काळ लोटला आहे. घटस्फोटानंतर दोघांनीही स्वत:चे स्वतंत्र मार्ग निवडले असून मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर अरबाजदेखील इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खानबॉलिवूडसेलिब्रिटीअर्जुन कपूर