Join us

अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 14:01 IST

अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' हा चित्रपट चर्चेत आला आहे

Anushka Sharma: अनुष्का शर्मा ही बॉलिवूडच्या टॉप १० अभिनेत्रींपैकी एक आहे.  २००८ मध्ये 'रब ने बना दी जोडी' या आदित्य चोप्राच्या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या अनुष्कानं बॉलिवूडला अनेक हीट चित्रपट दिले आहेत. पण, सध्या  बऱ्याच काळापासून अनुष्का पडद्यापासून दूर आहे. पण, तिच्या कमबॅकची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अनुष्का पडद्यावर पुन्हा कधी दिसणार याबद्दल चाहते विचारत असतात. काही काळापुर्वी चर्चा होती की अनुष्का  'चकदा एक्सप्रेस' (Anushka Sharma Comeback Chakda Xpress ) या चित्रपटातून दमदार कमबॅक करणार आहे. पण, या सिनेमाच्या प्रदर्शनाला विलंब होतोय. अशातच आता दिब्येंदु भट्टाचार्य यांनी 'चकदा एक्सप्रेस' सिनेमावर भाष्य केलं.

दिब्येंदू भट्टाचार्य यांनी गेल्या महिन्यात अविनाश पाल यांच्याशी बोलताना 'चकदा एक्सप्रेस' चित्रपटावर चर्चा केली. चित्रपट बराच काळ रखडला आहे, तो प्रदर्शित का केला जात नाहिये असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत दिब्येंदू भट्टाचार्य म्हणाले, "मलाही माहित नाही. पण, हा खूप चांगला चित्रपट आहे. अनुष्का शर्माने आतापर्यंतचा तिचा सर्वोत्तम अभिनय दिला आहे. पण, तो कधी प्रदर्शित होईल, याबद्दल कल्पना नाही. तो प्रदर्शित झाला पाहिजे".

 'चकदा एक्सप्रेस' हा चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये अनुष्का ही झुलनच्या भूमिकेत आहे. झुलन गोस्वामीने मिताली राजकडून कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि आशिया कपमध्ये १०० एकदिवसीय विकेट्स घेणारी ती चौथी महिला ठरली होती. तिने २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं आहे. अनुष्का शर्माबद्दल बोलायचं झालं तर ती गेल्या ६ वर्षांपासून पडद्यावरुन गायब आहे. ती शेवटची 'झिरो' चित्रपटात दिसली होती.  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला होता. त्यानंतर अनुष्का पडद्यावर दिसली नाही. सध्या अभिनेत्री तिच्या संसारात व्यस्त आहे.

टॅग्स :अनुष्का शर्मासेलिब्रिटीबॉलिवूड