Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशी सुरू झाली होती अतुल कुलकर्णी आणि गीतांजलीसह लव्हस्टोरी,जाणून कुटुंबीयांनाही बसला होता धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 15:32 IST

१९९३ साली एनएसडीमध्ये अतुल कुलकर्णी आणि गीतांजली यांची भेट झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, या कवितेच्या ओळींप्रमाणे प्रत्येकाचं कुणावर तरी प्रेम असतं किंवा प्रत्येकाची काही ना काही प्रेमाची गोष्ट असते. अशीच काही तरी हटके प्रेमाची गोष्ट अभिनेता अतुल कुलकर्णी यांचीही आहे. मराठीसह हिंदी सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अतुल कुलकर्णी यांनी अभिनेत्री गीतांजलीसह लग्न केलं. या दोघांच्या प्रेमाची गोष्टही तितकीच हटके आहे. १९९३ साली एनएसडीमध्ये अतुल आणि गीतांजली यांची भेट झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

२९ डिसेंबर १९९६ रोजी पुण्यात दोघं रेशीमगाठीत अडकले. मात्र गीतांजली यांच्यासह ओळख होणं, मग मैत्री आणि त्याचं रुपांतर प्रेमात होणं हे सुखद आश्चर्याचा धक्का होता असं अतुल कुलकर्णी यांनी टीव्हीवरील एका प्रसिद्ध चॅट शोमध्ये सांगितलं होतं. स्वतःसाठीच नाही तर हा कुटुंबीयांसाठीही मोठा धक्का होता अशी कबूली अतुल कुलकर्णी यांनी दिली होती. 

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या अतुल यांना ‘हे राम’ आणि ‘चांदनी बार’ सिनेमातील भूमिकांसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विविध भाषांमधून ६० पेक्षा जास्त सिनेमात काम केलेल्या अतुल यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.  हे राम, चांदनी बार, खाकी, पेज ३, रंग दे बसंती, वळू, नटरंग, एका प्रेमाची गोष्ट अशा सिनेमांमधून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

अतुल कुलकर्णी यांच्या प्रमाणे त्यांची पत्नी गीतांजलीदेखील रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ‘सेक्स, मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप’, ‘गजब कहानी’, ‘ड्रीम्स ऑफ तलीम’, ‘पिया बहुरुपिया’ यांसारख्या नाटकांमध्ये काम आणि ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचे शिक्षण ही त्यांची पार्श्वभूमी आहे.'कोर्ट' या सिनेमात गीतांजली कुलकर्णी यांनी ‘नूतन’ या पब्लिक प्रोसिक्युटरची भूमिका साकारली होती. दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगताना गीताजली यांनी सांगितले होते की,  ''परफेक्शनिस्ट अतुलची पत्नी असण्यापेक्षा मी त्याची शिष्य किंवा फॉलोअर अधिक बनलेय.'

टॅग्स :अतुल कुलकर्णी