Join us

जेव्हा अ‍ॅक्शन सीनसाठी ३० फूटांवरुन अमिताभ बच्चन यांनी मारली होती उडी; म्हणाले, "ना हारनेस, ना VFX..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 11:19 IST

७०-८०च्या दशकात प्रगत टेक्नोलॉजी नसल्याने अ‍ॅक्शन सीन्स करणं म्हणजे महादिव्य असायचं. अनेकदा कलाकारांना जोखीम पत्करून असे सीन करावे लागायचे. अमिताभ बच्चन यांनी अशाच एका सीनचा किस्सा शेअर केला आहे. 

बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूडमधील महानायक आहेत. ७०-८०च्या दशकात त्यांनी बॉलिवूड दणाणून सोडलं. एक सो एक अ‍ॅक्शन पट त्यांनी बॉलिवूडला दिले. 'शोले', 'दीवार','मर्द', 'शहनशहा', 'अग्नीपथ', 'कुली', 'झंजीर' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. अभिनयाबरोबरच अमिताभ यांनी त्यांच्या अ‍ॅक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, तेव्हाच्या काळात मात्र प्रगत टेक्नोलॉजी नसल्याने अ‍ॅक्शन सीन्स करणं म्हणजे महादिव्य असायचं. अनेकदा कलाकारांना जोखीम पत्करून असे सीन करावे लागायचे. अमिताभ बच्चन यांनी अशाच एका सीनचा किस्सा शेअर केला आहे. 

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्यांनी सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते अ‍ॅक्शन सीन करताना दिसत आहेत. दगडावरून उडी घेताना बिग बी या फोटोत दिसत आहेत. हा फोटो शेअर करत ते म्हणतात, "अ‍ॅक्शन सीनसाठी ३० फूटांवरुन उडी मारताना...ना हारनेस, ना फेस रिप्लेसमेंट, ना व्हिएफएक्स ...आणि मॅटरेसेसवर लँडिंग...जर तुम्ही नशीबवान असाल तर...काय दिवस होते ते...". 

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ८१ वर्षांचे अमिताभ बच्चन आजही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. कल्की २८९८ या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शूबाईट हा त्यांचा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :अमिताभ बच्चनसिनेमासेलिब्रिटी