Join us
Daily Top 2Weekly Top 5

शााहरुखने गौरीला व्हॅलेंटाईन डेला पहिल्यांदा काय गिफ्ट दिलं? किंग खानचा क्यूट खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 11:32 IST

शाहरुख खानने गौरीला पहिल्यांदा व्हॅलेंटाईन डेला काय गिफ्ट दिलं?

शाहरुख खानला रोमान्सचा किंग समजलं जातं. शाहरुखने आजवर विविध सिनेमांमधून त्याच्या अभिनयाची छाप पाडली. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 ला शाहरुखने तिनही सिनेमांमधून ब्लॉकबस्टर कामगिरी केली. 'पठाण', 'जवान', 'डंकी' या तीन सिनेमांमधून शाहरुखने पुन्हा एकदा त्याला बॉलीवूडचा किंग खान का म्हणतात, हे दाखवून दिलं. शाहरुखने विविध प्रेमपट करून एक रोमँटिक हिरो म्हणून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. आगामी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर शाहरुखच्या आयुष्यातला असाच एक किस्सा वाचा. 

शाहरुखचं त्याची पत्नी गौरी खानवर किती प्रेम आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. विविध मुलाखतींमधून याशिवाय पार्टी, इव्हेंटस मध्ये शाहरुख गौरीवरचं प्रेम दर्शवत असतो. शाहरुख आणि गौरी सुरुवातीच्या काळात जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा शाहरुखने गौरीला काय गिफ्ट दिलं होतं याचा खुलासा झालाय...

2023 मध्ये, जेव्हा शाहरुख खान ट्विटरवर आस्क एसआरकेमध्ये चाहत्यांशी बोलत होता, तेव्हा एका चाहत्याने त्याला विचारले, "व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्ही गौरी मॅडमला दिलेली पहिली भेट काय होती?" यावर शाहरुख खानने उत्तर दिले, "मला बरोबर आठवत असेल तर त्या घटनेला ३४ वर्षे झाली आहेत. मी तिला गुलाबी रंगाचे प्लास्टिकचे कानातले दिले होते." शाहरुखच्या या उत्तराने सर्वांचं मन जिंकलं होतं. शाहरुखचे २०२४ मध्ये कोणतेही नवीन सिनेमे भेटीला येणार नाहीत. शाहरुखने सध्यातरी ब्रेक घेतलेला दिसतोय.

टॅग्स :शाहरुख खानगौरी खान