Join us
Daily Top 2Weekly Top 5

What!! लग्नासाठी प्राजक्ता माळीला नकोय महाराष्ट्रीयन मुलगा, खुद्द जवळच्या मैत्रिणीनं केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 12:23 IST

Prajakta Mali : प्राजक्ता पुढच्या वर्षी लग्न करणार आहे, अशी सध्या चर्चा रंगली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ला सातत्याने चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. दरम्यान नुकतेच प्राजक्ता माळीने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिला तिच्या लग्नाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

प्राजक्ता पुढच्या वर्षी लग्न करणार आहे, अशी सध्या चर्चा रंगली आहे. त्यावर ती म्हणाली की, हे दरवर्षी म्हटलं जाते. २०१८ पासून हे सर्व सुरु आहे. यावर्षी नाही नाही पुढच्या वर्षी असे सर्व सुरु आहे आणि हे सुरुच आहे. पण अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मी लग्न करु नये.

पुढे ती म्हणाली की, काहींना वाटते मी लग्न करावं, काहींना वाटतंय मी करु नये. त्यांच्यामुळे माझे लग्न रखडत आहे. त्या मुलांमुळे माझे लग्न रखडलंय. त्या मुलांची अशी इच्छा आहे की मला हिला भेटायचे, त्याशिवाय हिचे लग्न होता कामा नये. त्यामुळे माझ लग्न रखडले आहे.प्राजक्ता माळीचे हे उत्तर ऐकून तिची मैत्रीण आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे म्हणाली की, तुला कुठे महाराष्ट्रीयन मुलगा हवाय, तुला कोण हवाय ते सांग ना. त्यावर प्राजक्ता म्हणाली की,माझं अनेक दाक्षिणात्य सुपरस्टार जे आहेत, त्यांच्यावर जास्त क्रश आहे. पण कोणीही असले ना, तरी शेवटी आपण त्याला मराठीच बनवायचे.

दरम्यान प्राजक्ता माळीच्या या वक्तव्यानंतर तिला अमराठी मुलाशी लग्न करायचे असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र तिने या मुलाखतीत कुठेही असे स्पष्ट केलेले नाही. प्राजक्ता माळीने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ती लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले होते. आता प्राजक्ता माळी कधी लग्नगाठ बांधते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीऋतुजा बागवे