Join us
Daily Top 2Weekly Top 5

असं काय घडलं की उर्वशी रौतेला 'चाँद कहां से लाओगी'च्या सेटवर लागली रडू, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 13:48 IST

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा म्युझिक अल्बम वो चाँद कहां से लाओगी नुकताच रिलीज झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा म्युझिक अल्बम वो चाँद कहां से लाओगी नुकताच रिलीज झाला आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या गाण्यात उर्वशी रौतेला सोबत मोहसीन खान पहायला मिळतो आहे. या गाण्याच्या शूटिंगवेळचा उर्वशी रौतेलाचा किस्सा समोर आला आहे. 

उर्वशी रौतेला आणि मोहसीन खान वो चाँद कहां से लाओगीचे जोरात प्रोमोशन्स करत आहे. उर्वशी रौतेला आणि मोहसीन खान इंस्टाग्राम लाईव्हवर आपल्या चाहत्यांशी गप्पा मारत होते, त्यात मोहसीन खान म्हणाला, शेवटच्या सीनमध्ये उर्वशीचे इमोशनल सीन होते, ज्यामध्ये उर्वशी खूप भावूक झाली होती. ती आपल्या भूमिकेत इतकी गुंतली होती की त्या बॅकशॉटमध्ये पण ती रडत होती. उर्वशी रौतेला खूप खूप चांगली अभिनेत्री आहे.

यावर उर्वशी रौतेलाने उत्तर दिले की, खरेतर हे गीत एवढे सुंदर व त्यामध्ये इतकी यातना आहे की त्या सीनमध्ये मला माझे भावना व्यक्त करण्यामध्ये कोणतीच अडचण नाही आली. 

उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती व्हर्जिन भानुप्रिया या कॉमेडी ड्रामा चित्रपटात दिसली होती. यात गौतम गुलाटी आणि अर्चना पूरन सिंग यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. उर्वशी लवकरच तेलगू चित्रपट ब्लॅक रोझमध्ये झळकणार आहे.

 

टॅग्स :उर्वशी रौतेलामोहसिन खान