Join us

'लागीरं झालं जी' फेम विकी पडला प्रेमात, इंस्टाच्या पोस्टने रंगली चर्चा, फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 11:12 IST

अचानक काही कारणाने झालेली भेट आणि त्या भेटीचं हळूहळू प्रेमात होणार रूपांतर हे काही कुणासाठी नवीन नाही. म्हणजे एखाद्या सिनेमाला शोभावं असंच हे सगळं घडत असतं. एंटरटेनमेंट विश्वातही हे काही नवीन नाही. सध्या अशाच एका गोड जोडीमध्ये गुपचूप गुपचूप काहीतरी सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नवले.

अचानक काही कारणाने झालेली भेट आणि त्या भेटीचं हळूहळू प्रेमात होणार रूपांतर हे काही कुणासाठी नवीन नाही. म्हणजे एखाद्या सिनेमाला शोभावं असंच हे सगळं घडत असतं. एंटरटेनमेंट विश्वातही हे काही नवीन नाही. सध्या अशाच एका गोड जोडीमध्ये गुपचूप गुपचूप काहीतरी सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नवले. या दोघांची प्रेमकहाणी सध्या गुलाबी थंडीप्रमाणे गुलाबी रंगात फुलू लागली आहे.

'लागीरं झालं जी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला विकी म्हणजेच निखिल चव्हाण अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. याच निखिलची प्यारवाली लव्हस्टोरी सध्या वाऱ्यासारखी पसरत आहे. झालं असं की, निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भाग्यश्रीसोबतचा एक स्पेशल फोटो शेअर केलाय. पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्या फोटोला दिलेल्या कॅपशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो शेअर करत निखिलने Something....something.... something..असं लिहीत चांगले दोन-तीन हार्टही शेअर केले आहेत. आता इतकं तर कुणालाही कळेल की हे नेमकं काय आहे.

खरंतर या लव्हस्टोरीची सुरुवात झाली ती पुण्यातील महालक्ष्मी मंदिरातून आणि आता दोघेही एकमेकांची साथ एन्जॉय करण्यासाठी डेटला जाऊ लागले आहेत. नुकतंच या लव्ह बर्डसना विरारच्या फार्म हाऊसवर सोबत बघण्यात आलं. सध्या निखिल हा भाग्यश्रीला आनंदी ठेण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना लढवतोय. 

त्याहूनही महत्वाचं म्हणजे ही रिअल लाईफ लव्हबर्डस 'शुद्धदेसी मराठी'च्या 'स्त्रीलिंग पुलिंग' या नव्या कोऱ्या-करकरीत वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे आधीच त्यांची फुलत असलेली लव्हस्टोरी चर्चेत आहे. आणि त्यात त्यांची ही वेब सीरिजही रिलीज होणार त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. याच वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झालाय. तो तुम्हाला खाली बघता येईल.

टॅग्स :स्त्रीलिंग पुल्लिंगवेबसीरिजलागिरं झालं जी