Join us

सध्या काय करतो 'अग्गंबाई सासूबाई'मधील बबड्या?, इंस्टाग्रामवर आशुतोष पत्कीने दिली ही अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 15:57 IST

अभिनेता आशुतोष पत्की सध्या मालिकेत काम करताना दिसला नसला तरी तो सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

झी मराठी वाहिनीवरील अग्गंबाई सासूबाई या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेतील बबड्या या व्यक्तिरेखाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. या मालिकेत ही व्यक्तिरेखा आशुतोष पत्कीने साकारली होती. ही मालिका संपली आणि त्याच्या पुढचे पर्व दाखल झाले ते म्हणजे अग्गंबाई सूनबाई. या पर्वात आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधान काम करत नाहीत. तसेच आशुतोष या मालिकेनंतर कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसला नाही. मात्र आता त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत तो नवीन प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगितले आहे.

अभिनेता आशुतोष पत्की सध्या मालिकेत काम करताना दिसला नसला तरी तो सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. या माध्यमातून तो चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर स्टोरीवर एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, काहीतरी नवीन. या फोटोत तो कोणता तरी सेट दिसतो आहे. त्यामुळे आशुतोषने नवीन प्रोजेक्टच्या कामाला सुरूवात केल्याचे समजते आहे. मात्र हा चित्रपट आहे की मालिका हे अद्याप समजू शकलेले नाही.

आशुतोषने मालिकेनंतर त्याच्या लूकमध्ये बदल केल्याचेही पहायला मिळते. तसेच सोशल मीडियावर त्याने स्क्रीप्ट वाचतानाचा फोटो शेअर करत काहीतरी नवीन करतो असे आपल्या चाहत्यांना सांगितले होते. त्याचे चाहते त्याला पुन्हा एकदा काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

आशुतोष ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून त्याने वन्स मोअर या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले.

अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या आधी त्याने ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख अग्गंबाई सासूबाई या मालिकेमुळे मिळाली.

टॅग्स :आशुतोष पत्कीअग्गंबाई सासूबाई