Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या प्रकरणाने अचानक डोकं वर काढलं अन्..'; सापाचं विष पुरवण्याप्रकरणी एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:19 IST

Elvish yadav: रेव्ह पार्टीमध्ये एल्विश यादवने सापाचं विष पुरवल्याचं म्हटलं जात होतं. याप्रकरणी त्याला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या सगळ्या प्रकारावर आता त्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस ओटीटी 2' चा विनर एल्विश यादव (Elvish yadav)  सातत्याने चर्चेत येत आहे. एका पार्टीमध्ये सापांचं विष पुरवल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. जवळपास 5 दिवस न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या एल्विशने नुकतीच या प्रकरणी त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एल्विशने ABP न्यूजला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्यावर झालेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाला एल्विश यादव?

"रेव्ह पार्टीत सापांचं विष खरोखरच पुरवलं होतंस का? असा प्रश्न एल्विशला विचारण्यात आला. यावर त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. माझा न्यायव्यवस्था, आणि कायदेप्रणालीवर पूर्ण विश्वास आहे. ते जो काही निर्णय घेतील तो योग्य असेल आणि नक्कीच आमच्या बाजूने असेल", असं एल्विश म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मला माहित नाही माझ्यावर हे काय आरोप करण्यात आलेत. त्या दिवशी मी मुंबईमध्येच होतो. बातम्यांमध्ये पाहिलं तर माझ्यावर नको नको ते आरोप करण्यात येत होते. त्यानंतर मधल्या ५ महिन्यात काहीही झालं नाही. मग अचानक पुन्हा या प्रकरणाने डोकं वर काढलं. तुम्ही लोकांनीच माझी ही बातमी केली. माझे सापांसोबतचे जे व्हिडीओ व्हायरल झाले ते व्हिडीओ एका गाण्याचा भाग होते. फाजिल पुरिया यांच्या 'लड़की ब्यूटीफुल कर गई चुल' आणि 'है 32 बोर' ही दोन गाणी अजूनही युट्यूबवर आहेत आणि या गाण्यात सापासोबतचे सीन आहेत. याच गाण्याचा बीटीएस व्हिडीओ तो होता. पण, या व्हिडीओला तुम्ही लोकांनी वेगळा अँगल दिला."

"एखाद्या व्यक्तीवर जेव्हा नाहक आरोप केले जातात त्यावेळी त्याच्या त्याच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्याच्या कुटुंबावर मानसिक ताण येतो. घरात उदास आणि तणावपूर्ण वातावरण राहतं. आता तर माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पण, हळूहळू काळानुसार सगळं ठीक होईल. न्यायव्यवस्था जो निर्णय देईल तो मान्य असेल."

दरम्यान, एल्विश यादव कायम त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत येतो. परंतु, त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी मोठा खुलासा केला. एल्विशकडे कोणतीही महागडी कार नसून तो मित्रांकडून भाड्याने गाड्या घ्यायचा आणि रील्स करायचा असा खुलासा त्याच्या वडिलांनी केला होता.

टॅग्स :वेबसीरिजसेलिब्रिटीटिव्ही कलाकारबिग बॉस