Prajakta Koli Dance Video: सध्या सोशल मीडियावर संजू राठोडच्या शेकी गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या मराठमोळ्या गायकाच्या गाण्याचा सातासमुद्रापार डंका वाजतो आहे. या ट्रेंडिंग गाण्यावर फक्त सर्वसामान्य माणूसच नाहीतर अनेक कलाकाल देखील रिल्स व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. त्यात आता प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता कोळीला देखील शेकी गाण्याची भूरळ पडली आहे. 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर सुंदर व्हिडीओ बनवत तिने भन्नाट डान्स केला आहे.
आतापर्यंत ‘एक नंबर तुझी कंबर’वर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आता या व्हायरल व्हिडीओमध्ये युट्यूबर, अभिनेत्री प्राजक्ता कोळी कोरिओग्राफर हिमांशूसह या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत, जे पाहून नेटकरीही कौतुक करत आहेत. मोस्ट्लीसेन' आणि 'मिसमॅच' सारख्या वेबसिरीजमुळे सध्याच्या यंग तरुणाईत अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या 'प्राजक्ता कोळीचे' फॅनफॉलोअर्स फार मोठ्या प्रमाणात आहेत. तिचे बरेच चाहते तिच्या सौंदर्यावर देखील फिदा आहेत.
दरम्यान, या व्हिडीओच्या सुरुवातीला अभिनेत्री गाण्याच्या ओळींप्रमाणे तिचे कानातले आणि नोज पिन फ्लॉंन्ट करताना दिसते. तिचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताच्या या व्हायरल व्हिडीओवर चक्क संजू राठोडने एक नंबर अशी कमेंट केली आहे. प्राजक्ता कोळीच्या डान्स व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्स करत भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. "तुला १०० पैकी १००..." , तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, "एकदम सुंदर...", अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
प्राजक्ता कोळी ही ठाण्यातील मराठी कुटुंबात जन्माला आली. युट्यूबर ते अभिनेत्री आणि आता समाजसेविका अशी तिची नव्याने ओळख झाली आहे. आधी ती रेडिओ जॉकी म्हणून काम करत होती. नंतर तिने फुलटाईम युट्यूबर म्हणून काम सुरु केलं होतं. प्राजक्ताने पर्यायवरणविषयक अनेक उपक्रमांसाठी परदेशातही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.