अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी ही जोडी 'देवखेळ' सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याआधी दोघं २०२२ साली आलेल्या'लकडाऊन' सिनेमात एकत्र दिसले होते. प्राजक्ता 'फुलवंती' नंतर बऱ्याच दिवसांनी एखाद्या प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. देवखेळ ही तिची दुसरी वेबसीरिज आहे. तर अंकुश चौधरी पहिल्यांदाच वेबसीरिजमध्ये झळकत आहे. सीरिजच्या प्रमोशननिमित्त अंकुशला एक प्रश्न विचारण्यात आला. 'तुझ्या दिग्दर्शित सिनेमात प्राजक्ताला कधी घेणार?' यावर अंकुशने काय उत्तर दिलं वाचा.
प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत अंकुश चौधरी म्हणाला, "मला असं वाटतं माझ्याकडे खूप चांगलं काहीतरी यायला हवं. मलाही तिच्याबरोबर पुन्हा काम करायला आवडेल. तिला दिग्दर्शित करायलाही आवडेल. फक्त चांगली भूमिका आली पाहिजे. मला तिला छोट्या मोट्या रोलसाठी विचारुन चालणार नाही. कारण मला तिची क्षमता माहितीये. तिची क्षमता खूप मोठी आहे. तसंच आता प्राजक्ता निर्माती झाली आहे त्यामुळे ती कधी मला तिच्या सिनेमात घेते याचीही मी वाट पाहत आहे."
यावर प्राजक्ता माळी म्हणाली, "मला खरंच अंकुश दादाच्या दिग्दर्शनाखाली काम करायला आवडेल. कारण मला खात्री आहे की तो कामात एखदम ठराविक असेल. मला हा अँगल हवा, हेच हावभाव हवे, बास..कट..यापुढचं मला काही नको. इतका तो ठराविक असतील. त्याच्या डोक्यात तो एकदम क्लिअर असतो. त्यामुळे मला अंकुश दादाच्या दिग्दर्शनाखाली काम करायची खूप इच्छा आहे."