ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली एक नवी वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर आलेली ही सीरिज अवघ्या काही दिवसांतच नंबर-१ ट्रेंडिंग ठरली असून इतर नव्या सीरिजनाही मागे टाकलं आहे. ही ७ एपिसोड्सची सीरिज असून प्रत्येक भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आहे. या सीरिजला IMD वर ७.१ रेटिंग मिळालं आहे.
क्राइम, मिस्ट्री आणि थ्रिलने भरलेली ही स्पोर्ट्स ड्रामा सीरिज आहे. विशेष म्हणजे, या सीरिजने दोन आठवड्यांपासून टॉपवर असलेल्या If Wishes Could Kill या साऊथ कोरियन थ्रिलरला मागे टाकलं आहे. या सीरिजचं नाव आहे Glory. हरियाणाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा दोन भावांभोवती फिरते.
या कथेत देव (दिव्येंदु शर्मा) आणि रवि (पुलकित सम्राट) हे दोन विभक्त भाऊ बहिणी गुडिया (जन्नत जुबैर) वर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचं आणि तिच्या बॉक्सर प्रियकर निहाल सिंगच्या हत्येचं गूढ उलगडण्यासाठी घरी परततात. या तपासादरम्यान त्यांना अनेक धोक्यांना सामोरं जावं लागतं. ही कथा सूड, नात्यांमधील गुंतागुंत आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या स्वप्नाभोवती फिरते. शेवटचा क्लायमॅक्स इतका थरारक आहे की प्रेक्षक थक्क होतात.
१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये दिव्येंदु शर्मा, पुलकित सम्राट, सुविंदर विक्की, आशुतोष राणा, सायानी गुप्ता, जन्नत जुबैर आणि कुणाल ठाकुर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सध्या ही सीरिज नेटफ्लिक्स वर स्ट्रीम होत असून, अवघ्या काही दिवसांतच तिने ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
Web Summary : A new crime, mystery, and thriller series, Glory, is trending on Netflix. The 7-episode sports drama, set in Haryana, revolves around two estranged brothers investigating a deadly attack and murder. Starring Divyenndu Sharma and Pulkit Samrat, it surpassed the South Korean thriller 'If Wishes Could Kill' and earned an IMDb rating of 7.1.
Web Summary : नेटफ्लिक्स पर एक नई क्राइम, मिस्ट्री और थ्रिलर सीरीज, ग्लोरी ट्रेंड कर रही है। हरियाणा में सेट 7-एपिसोड का स्पोर्ट्स ड्रामा, एक घातक हमले और हत्या की जांच कर रहे दो अलग हुए भाइयों के चारों ओर घूमता है। दिव्येंदु शर्मा और पुलकित सम्राट अभिनीत, इसने दक्षिण कोरियाई थ्रिलर 'इफ विशेस कुड किल' को पीछे छोड़ दिया और IMDb रेटिंग 7.1 अर्जित की।