Join us

'त्यांच्यासोबत काम करणं सोपं नाही'; मराठी कलाकारांविषयीचं सुश्मिताचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 15:00 IST

Sushmita sen: एका मुलाखतीदरम्यान सुश्मिताने मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगितलं.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिची ताली ही वेबसीरिज सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजत आहे. तृतीयपंथियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये सुश्मिता मुख्य भूमिकेत झळकली आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत अनेक मराठी कलाकारांनीही स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे या मराठी कलाकारांविषयी सुश्मिता पहिल्यांदाच व्यक्त झाली. 

'ताली' वेबसीरिजचं प्रमोशन करत असताना सुश्मिता सेन हिने एक मुलाखत दिली होती. यावेळी तिने मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.  "मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव होता. ते फार दर्जेदार कलाकार आहेत. कधी कोणत्या नाटकासाठी आपण तयारी करतो तशीच ते त्यांच्या भूमिकेसाठीचा अभ्यास करतात. त्या भूमिकेला जगण्याची एक स्किल त्यांच्यात आहे. त्यांच्यासोबत काम करायला मज्जा येते पण, त्यांच्यासोबत दडपणसुद्धा येतं. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं कधीच सोपं नाही," असं सुश्मिता म्हणाली.

Taali Review: गौरी सावंतची 'ताली' प्रेक्षकांपर्यंत पोहोचली का? जाणून घ्या कशी आहे वेबसीरिज

पुढे ती म्हणते, "मी मराठी भाषादेखील शिकले. रवी जाधव यांनी मला ज या अक्षराचे केले जाणारे वेगवेगळे उच्चारण शिकवले. मराठीत बोलण्यासाठी मी मराठीतील शिव्यादेखील शिकले."

'क्षितिज काय लिहिलंय रे बाबा...' ; 'ताली' पाहून गौरी सावंतची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, या सीरिजच्या माध्यमातून सुश्मिताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. जिओ स्टुडिओवर रिलीज झालेली ही सीरिज सध्या चांगलीच गाजत आहे. या सीरिजमध्ये सुश्मितासोबत सुव्रत जोशी, हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर हे कलाकार झळकले आहेत. 

टॅग्स :सुश्मिता सेनसुव्रत जोशीहेमांगी कवीऐश्वर्या नारकरवेबसीरिज