The Family Man Season 3 Release Date Out: 'श्रीकांत तिवारी कधी येणार?' असा प्रश्न विचारणाऱ्या देशभरातील 'द फॅमिली मॅन' (The Family Man) च्या कोट्यवधी चाहत्यांसाठी अखेर एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. 'श्रीकांत तिवारी'च्या भूमिकेतून पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी मनोज वाजपेयी सज्ज झाले आहेत. अखेर आज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने 'द फॅमिली मॅन सीझन ३'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत होते.
प्राइम व्हिडीओने चाहत्यांना उत्सुकता वाढवणारा एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात 'श्रीकांत तिवारी'च्या स्टाईलमध्ये रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २१ नोव्हेंबर रोजी ही बहुप्रतिक्षित सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे अपडेच समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही वेब सीरिज कॉमेडी आणि स्पाय थ्रिलरचा यांचा मेळ आहे. पुन्हा एकदा 'राज अँड डीके' (Raj & DK) यांच्या दिग्दर्शनाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी 'द फॅमिली मॅन ३'मध्ये 'पाताल लोक' फेम सुप्रसिद्ध अभिनेता जयदीप अहलावत आणि अभिनेत्री निम्रत कौर पाहायला मिळणार आहे. आता रिलीज डेट समोर आल्यानंतर चाहत्यांना ट्रेलरची उत्सुकता लागली आहे.
'द फॅमिली मॅन' या सीरिजचा पहिला सीझन हा २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये मनोज वाजपेयी यांच्यासह अभिनेत्री प्रियामणीनं मनोज (श्रीकांत) यांच्या पत्नीची (सुचित्रा तिवारी) भूमिका साकारली. तसेच, शारीब हाश्मी (Sharib Hashmi) यांनी त्यांचा विश्वासू सहकारी जे. के. तलपदेची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. तर दुसरा सीझन २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. हा सीझन अधिक थ्रिलिंग ठरला आणि यात अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने 'राजी' या निगेटिव्ह भूमिकेत दमदार अभिनय करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता तिसऱ्या सीझनमध्ये जुन्या कलाकारांसोबत नवीन आणि तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. जयदीप अहलावत आणि निम्रत कौर यांच्यासारखे दिग्गज कलाकार या सीरिजमध्ये सामील झाल्यानं 'द फॅमिली मॅन ३' ची कथा आणि थरार एका वेगळ्याच स्तरावर असेल. आता २१ नोव्हेंबर रोजी ही सीरिज पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
Web Summary : The Family Man Season 3 will premiere on November 21st. Manoj Bajpayee returns as Srikant Tiwari. The series will feature Jaideep Ahlawat and Nimrat Kaur. Fans eagerly anticipate the new season.
Web Summary : द फैमिली मैन सीजन 3 का प्रीमियर 21 नवंबर को होगा। मनोज बाजपेयी श्रीकांत तिवारी के रूप में लौट रहे हैं। श्रृंखला में जयदीप अहलावत और निम्रत कौर भी होंगे। प्रशंसक बेसब्री से नए सीजन का इंतजार कर रहे हैं।