Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द फॅमिली मॅन ३'साठी मनोज वाजपेयींना मिळाले 'इतके' कोटी, तर जयदीप अहलावतला मिळाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:12 IST

द फॅमिली मॅन वेबसीरिज उद्या रिलीज होणार आहे. या वेबसीरिजमध्ये कोणाला किती मानधन मिळालं? जाणून घ्या

ॲमेझॉन प्राइम व्हिडिओची सर्वाधिक लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित वेबसीरिज 'द फॅमिली मॅन' (The Family Man) चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुप्तचर अधिकारी श्रीकांत तिवारीची भूमिका साकारणारे अभिनेते मनोज वाजपेयी पुन्हा एकदा नवीन मिशनसाठी कमबॅक करणार आहे. हा सीझन २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. जाणून घ्या कोणाला किती मानधन मिळालं.

मनोज बाजपेयीला सर्वाधिक मानधन

या सीरिजमध्ये श्रीकांत तिवारीची मुख्य भूमिका साकारणारे मनोज वाजपेयी यांना सर्वाधिक मोठी रक्कम मिळाली आहे. ABP च्या रिपोर्टनुसार, 'द फॅमिली मॅन ३' साठी मनोज वाजपेयींचे मानधन २०.२५ कोटी ते २२.५० कोटी रुपयांदरम्यान आहे, जे सर्व कलाकारांमध्ये जास्त आहे.

या सीझनमध्ये काही नवीन चेहऱ्यांची एंट्री झाली आहे, ज्यामुळे सीरिजची उत्सुकता वाढली आहे. 'पाताल लोक' फेम जयदीप अहलावत हा खलनायक रुक्माच्या भूमिकेत सीरिजमध्ये दिसणार असून, त्याला यासाठी ९ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अभिनेत्री निम्रत कौर ही देखील 'द फॅमिली मॅन ३' च्या नवीन स्टार कास्टपैकी एक आहे. तिला भूमिकेसाठी ८ ते ९ कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती आहे. याच श्रेणीत, मेजर समीरची भूमिका साकारणाऱ्या दर्शन कुमारलाही ८ ते ९ कोटी रुपये मिळाले आहेत.

श्रीकांत तिवारीची पत्नी सुचित्रा तिवारीची भूमिका साकारणाऱ्या प्रियामणीला या सीझनसाठी ७ कोटी रुपये मिळाले आहेत. श्रीकांतचा विश्वासू सहकारी जेके तळपदेची भूमिका साकारणाऱ्या शारिब हाशमीला ५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर, श्रीकांतची मुलगी धृती तिवारीची भूमिका साकारणाऱ्या अश्लेषा ठाकूरला ४ कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'The Family Man 3': Manoj Bajpayee's fees revealed, others' salaries.

Web Summary : Manoj Bajpayee earns ₹20.25-22.50 crore for 'The Family Man 3,' the highest among the cast. Jaideep Ahlawat gets ₹9 crore, while Priyamani receives ₹7 crore. Sharib Hashmi and Ashlesha Thakur also have significant pay.
टॅग्स :मनोज वाजपेयीनिमरत कौरबॉलिवूडटेलिव्हिजनपरिवारवेबसीरिज