Join us

'द फॅमिली मॅन ३'चं शूटिंग संपलं! मनोज वाजपेयींनी वेबसीरिजच्या रिलीजबाबत दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 17:25 IST

'द फॅमिली मॅन ३' रिलीज कधी होणार, याविषयी मोठी अपडेट स्वतः मनोज वाजपेयींनी दिलीय (the family man 3)

लॉकडाउनच्या काळात गाजलेली वेबसीरिज म्हणजे 'द फॅमिली मॅन'. ही वेबसीरिज चांगलीच चर्चेत राहिली. इतकंच नव्हे 'द फॅमिली मॅन'चा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझन कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. काहीच दिवसांपूर्वी तिसऱ्या सीझनच्या शूटिंगची घोषणाही झाली. आता नुकतंच 'द फॅमिली मॅन ३'मध्ये श्रीकांत तिवारीची भूमिका साकारणाऱ्या मनोज वाजपेयींनी तिसऱ्या सीझनबाबत मोठी अपडेट दिलीय. 

'द फॅमिली मॅन ३' चं शूटिंग संपलं 

मनोज वाजपेयींनी 'द फॅमिली मॅन ३'चं शूटिंग संपलं असल्याची घोषणा केलीय. मनोज वाजपेयींनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 'द फॅमिली मॅन ३' विषयी पोस्ट शेअर करुन लिहिलंय की, "its a wrap! शूटिंग पूर्ण झालीय. द फॅमिली मॅन ३ पाहण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागेल." अशाप्रकारे मनोज वाजपेयींनी 'द फॅमिली मॅन ३' विषयी महत्वाची अपडेट दिली असून पुढील वर्षी अर्थात २०२५ मध्ये 'द फॅमिली मॅन ३' रिलीज होण्याची शक्यता आहे.

 'द फॅमिली मॅन ३'मध्ये कलाकार कोण असणार?

 'द फॅमिली मॅन ३'मध्ये पुन्हा एकदा मनोज वाजपेयी श्रीकांत तिवारीची भूमिका साकारणार आहे. त्यांच्यासोबत प्रियामणी, शरीब हाश्मी हे कलाकारही झळकणार आहे. दुसऱ्या भागात समांथाने खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्यामुळे 'द फॅमिली मॅन ३'मध्ये श्रीकांत तिवारीसमोर खलनायक म्हणून कोणता कलाकार झळकणार याकडे सर्वांची उत्सुकता आहे. अशाप्रकारे शूटिंग संपल्याने  'द फॅमिली मॅन ३' २०२५ मध्ये नवीन वर्षात प्राइम व्हिडीओवर रिलीज होईल.

 

टॅग्स :मनोज वाजपेयीपरिवारवेबसीरिज