Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रागिनी MMS 3' मधून सनी लिओनीचा पत्ता कट? तमन्ना भाटियाची होणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:14 IST

Ragini MMS 3: रागिनी MMS 3 च्या माध्यमातून तमन्ना आणि जुनैद पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

२०११ साली रिलीज झालेली 'रागिनी MMS' ही हॉरर ड्रामा सीरिज सगळ्यांच्याच लक्षात असेल. या सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मिळालेल्या लोकप्रियतेमुळे या सीरिजचा रागिनी MMS 2 हा सीक्वलदेखील रिलीज झाला. या सीक्वलमध्ये अभिनेत्री सनी लिओनी मुख्य भूमिकेत होती. विशेष म्हणजे लवकरच या सीरिजचा तिसरा पार्टही येणार आहे. मात्र, या तिसऱ्या पार्टमधून सनी लिओनीचा पत्ता कट केल्याचं म्हटलं जातं आहे.

रागिनी MMS च्या तिसऱ्या पार्टमध्ये सनी लिओनी झळकणार नसून तिच्या जागी एक नवीन फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, रागिनी MMS 3 मध्ये आमिर खानचा लेक जुनैद आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया स्क्रीन शेअर करणार आहेत.

तमन्ना-जुनैद पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रीन

रागिनी MMS 3 च्या माध्यमातून तमन्ना आणि जुनैद पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे रुपेरी पडद्यावर या जोडीला पाहिण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र,सनी लिओनीच्या एण्ट्रीविषयी अद्यापही ठोस माहिती समोर आलेली नाही. 

दरम्यान, रागिनी MMS 3 चं दिग्दर्शन शशांक घोष करणार आहेत. शशांक यांनी रागिनी MMS च्या पहिल्या पार्टचंही दिग्दर्शन केलं होतं.  2011 साली रागिनी MMS  ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजमध्ये राजकुमार राव, कॅनाज मोतीवाल मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यानंतर रागिनी MMS चा दुसरा पार्ट आला. या दुसऱ्या पार्टमध्ये  सनी लियोनी, साहिल प्रेम, संध्या मृदुल, कॅनाज मोतिवाला झळकले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunny Leone out of 'Ragini MMS 3'? Tamannaah Bhatia to star.

Web Summary : Reportedly, Tamannaah Bhatia and Junaid Khan will star in 'Ragini MMS 3', replacing Sunny Leone. Shashank Ghosh directs, marking a new lead pair for the horror franchise.
टॅग्स :सनी लिओनीतमन्ना भाटियासिनेमासेलिब्रिटीवेबसीरिज