Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागा चैतन्यचं ओटीटीवर पदार्पण; 'धूथा'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:44 IST

Naga chaitanya: कन्फर्ट झोनमधून नागा चैतन्य पडला बाहेर; पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या अंदाजात

दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य (Naga chaitanya) गेल्या काही काळापासून सातत्याने त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत येत होता. अभिनेत्री समंथा रुथप्रभू हिच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्याच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या सगळ्याकडे दुर्लक्ष करत नागा चैतन्यने त्याचं लक्ष कामावर केंद्रित केलं होतं. आणि, त्यामुळेच त्याच्या पहिल्या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

नागा चैतन्य पहिल्यांदाच धूथा या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करत आहे. प्राइम व्हिडीओने धूथा या तेलुगू ओरिजनल सीरिजचा ट्रेलर रिलीज केला आहे. या सीरिजमध्ये नागा चैतन्य सागर या पत्रकाराची भूमिका साकारत आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये सागरच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची एक झलक दाखवण्यात आली आहे.

विक्रम के कुमार यांनी या 'धुथा'चं दिग्दर्शन केलं असून या सीरिजचे ८ एपिसोड आहेत. यात नागा चैतन्य व्यतिरिक्त पार्वती थिरुवोथु, प्रिया भवानी शंकर आणि प्राची देसाई ही कलाकार मंडळी झळकली आहेत.धूथा ही सीरिज १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काय आहे सीरिजची नेमकी कथा?मृत्यू सागर आणि त्याच्या आजूबाजुच्या लोकांभोवती फिरु लागतो. वृत्तपत्रांमध्येही त्या अदृश्यशक्तीविषयी काही कात्रण सापडून येतात. ज्यातून त्या शक्तीमुळे भविष्यातही मोठं संकंट येणार आहे याचे संकेत मिळतात. त्यामुळे सागर भविष्यात काही अघटित घडू नये यासाठी सुरु असलेलं मृत्यूतांडव थांबवण्याचा प्रयत्न करतो. आता यात तो यशस्वी होतो की नाही हे सीरिज पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.

कन्फर्ट झोनमधून नागा चैतन्य पडला बाहेर

या सीरिजच्या माध्यमातून पहिल्यांदाच नागा चैतन्य एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याने त्याचा कन्फर्ट झोन तोडला आहे.  "मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं होतं. मला स्वत:लाच आव्हान द्यायचं होतं. मी जे कधी केलं नाही ते मला करायचं होतं.  या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेली कथा काल्पनिक आहे. पण, त्यात दाखवण्यात आलेलं थ्रील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल", असं नागा चैतन्य म्हणाला.

टॅग्स :वेबसीरिजसेलिब्रिटीTollywoodसमांथा अक्कीनेनी