गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि शिल्पा शेट्टी या जोडीची जोरदार चर्चा रंगली आहे. जवळपास २६ वर्षानंतर ही जोडी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात होतं. या दोघांनी २००० मध्ये 'जंग' या सिनेमात अखेरच एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आजपर्यंत ही जोडी एकत्र झळकली नव्हती. त्यामुळे आगामी प्रोजेक्टमध्ये या दोघांना एकत्र पाहता येईल अशी आशा प्रेक्षकांना होती. मात्र,त्यांच्या या आनंदावर विरजन पडलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, जॅकी श्रॉफच्या या सीरिजमधून शिल्पाचा पत्ता कट झाला आहे.
जॅकी श्रॉफ लवकरच Amazon Prime Video च्या अपकमिंग COKE या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. याच सीरिजमध्ये त्याच्यासोबत शिल्पा शेट्टी झळकणार होती. मात्र, आता तिच्याऐवजी या सीरिजमध्ये दिल्ली क्राइम फेम शेफाली शाह झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
शिल्पाचा पत्ता का झाला कट?
सूत्रांच्या माहितीनुसार, या सीरिजसाठी शिल्पाच्या डेट्स जुळत नसल्यामुळे तिला यातून काढता पाय घ्यावा लागला आहे. जॅकी श्रॉफसोबत काम करायची संधी मिळाल्यामुळे शिल्पा आनंदित होती. मात्र, सध्या तिचं शेड्यूल बिझी असल्यामुळे तिला या सीरिजसाठी वेळ देता येणार नाही. ज्यामुळे मेकर्सने आता शिल्पाऐवजी अन्य दुसऱ्या अभिनेत्रीच्या नावाचा विचार सुरु केला आहे.
शेफाली शाहची होणार एन्ट्री?
शिल्पा शेट्टी ऐवजी या सीरिजमध्ये अभिनेत्री शेफाली शाह हिची निवड झाल्याचं म्हटलं जात आहे. दिल्ली क्राइममध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. त्यामुळे COKE या सीरिजमधील भूमिकेला ती न्याय देऊ शकेल असं मेकर्सचं मत आहे. त्यामुळे तिला या सीरिजमध्ये घेतल्याचं म्हटलं जात आहे.
Web Summary : Shilpa Shetty exits Jackie Shroff's web series 'COKE' due to scheduling conflicts. Shefali Shah, known for 'Delhi Crime', is likely to replace her in the Amazon Prime Video series, impressing makers with her acting skills.
Web Summary : शिल्पा शेट्टी ने डेट की समस्या के कारण जैकी श्रॉफ की वेब सीरीज 'कोक' छोड़ दी। 'दिल्ली क्राइम' फेम शेफाली शाह अमेज़ॅन प्राइम वीडियो सीरीज़ में उनकी जगह ले सकती हैं, जिन्होंने अपने अभिनय कौशल से निर्माताओं को प्रभावित किया।