Join us
Daily Top 2Weekly Top 5

भव्यदिव्य सेट अन् दमदार कथानक; बहुप्रतिक्षीत 'हिरामंडी'चा डोळे दिपवणारा फर्स्ट लूक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 12:41 IST

Heeramandi: हिरामंडी या वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असून या सीरिजचा दमदार फर्स्ट लूक समोर आला आहे.

भव्यदिव्य सेट, दर्जेदार कथानक आणि कलाकारांचे महागडे कपडे यांसाठी खासकरुन ओळखले जाणारे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali).  गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक त्यांच्या हिरामंडी (Heeramandi)

या सीरिजची आतुरतेने वाटत पाहात आहेत. मध्यंतरी या सीरिजच्या प्रदर्शनाची रिलीज डेट लांबवणीवर पडली होती. परंतु, आता प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता या  मोस्ट अवेटेड सीरिजचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.हिरामंडीच्या निमित्ताने संजय लिला भन्साळी पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण करत आहेत. हिरामंडी ही त्यांची पहिली वेबसीरिज असून या सीरिजच्या माध्यमातून स्वातंत्र्यापूर्वी वेश्यावस्तीतील जीवन कसं होतं, तेथील स्त्रियांची कहाणी या सीरिजमधून मांडण्यात येणार आहे.

काय आहे हिरामंडीच्या फर्स्ट लूकमध्ये

नुकताच हिरामंडीचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे भन्साळी यांच्या या सीरिजमध्येही भव्यदिव्य सेट, कलाकारांचे महागडे कपडे आणि दर्जेदार कथानक असल्याचं दिसून येतं. स्वातंत्र्यापूर्वी वेश्यावस्तीत राहणाऱ्या स्त्रियांचं जीवन नेमकं कसं होतं, त्यांच्या समाजातील वावर कसा होता हे या फर्स्ट लूकमधून दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्या काळी वेश्या व्यसाय करणाऱ्या स्त्रियांमध्येही एक महिला राणीसारखं राज्य करायची हे सुद्धा या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला अभिनेत्री मनिषा कोईरालाची झलक दाखवण्यात आली आहे. तिच्यानंतर आदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा असं एक-एक करत अभिनेत्रींचे फर्स्ट लूक दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रत्येकीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आहेत. 

संजय लीला भन्साळी यांची पहिली सीरिज

हिरामंडीचा हा फर्स्ट लूक नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रसिद्ध भारतीय निर्माता संजय लिला भन्साळी यांच्या पहिल्या ' हिरामंडी: द डायमंड'चा हा फर्स्ट लूक आहे, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.दरम्यान, आजवर असंख्य सिनेमे सुपरहिट दिल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी त्यांचा मोर्चा ओटीटीवर वळवला आहे. हिरामंडी ही त्यांची पहिली वेबसीरिज असून नेटफ्लिक्सवर ती प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये ऋचा चड्ढा, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख महत्त्वपूर्ण भूमिकेत झळणार आहे.  ही सीरिज २०२४ मध्ये म्हणजेच यावर्षी रिलीज होणार आहे

टॅग्स :वेबसीरिजसंजय लीला भन्साळीबॉलिवूडमनिषा कोईरालाआदिती राव हैदरीसोनाक्षी सिन्हा