Join us

सई ताम्हणकरची नवी हिंदी वेबसीरिज 'डब्बा कार्टल'चा टीझर रिलीज; टिफिन सर्व्हिस करणाऱ्या महिलांची रोमांचक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:27 IST

टिफिन सर्व्हिस देणाऱ्या साध्याभोळ्या महिलांची थरारक कहाणी डब्बा कार्टल वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सईची या हिंदी सीरिजमध्ये खास भूमिका आहे

सई ताम्हणकर सध्या सातवे आसमान पर आहे. सई ताम्हणकर सध्या विविध हिंदी आणि मराठी सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी सईची भूमिका असलेला 'अग्नी' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात प्रतीक गांधी आणि सई ताम्हणकरची भूमिका चांगलीच गाजली. आता सईची नवीन भूमिका असलेल्या 'डब्बा कार्टल' या वेबसीरिजचा टीझर रिलीज झालाय. या नव्या हिंदी वेबसीरिजमध्ये सई ताम्हणकरची खास भूमिका दिसणार आहे.

'डब्बा कार्टल' वेबसीरिजमध्ये काय दिसणार

 'डब्बा कार्टल' या वेबसीरिजमध्ये टिफिन सर्व्हिस चालवणाऱ्या मध्यमवर्गीय महिला पाहायला मिळतात. या महिला दिसायला साध्याभोळ्या असल्या तरीही त्या त्यांच्या टिफिन सर्व्हिसमधून मोठा स्कॅम करताना दिसतात. लोकांना डबे पुरवून या महिला बेकायदेशीर पदार्थांचा पुरवठा करतात. जेव्हा पोलिसांना या गोष्टीचा पत्ता लागतो तेव्हा या महिलांचा कसा पर्दाफाश होतो, याची कहाणी 'डब्बा कार्टल' वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सई ताम्हणकर या वेबसीरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

'डब्बा कार्टल' कधी रिलीज होणार

फरहान अख्तर, रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या 'डब्बा कार्टल' वेबसीरिजच्या टीझरने लोकांची उत्सुकता वाढवली आहे. हितेश भाटिया यांनी या वेबसिरिजचं दिग्दर्शन केलंय. या वेबसीरिजमध्ये सई ताम्हणकरसोबत शबाना आझमी, ज्योतिका, गजराज राव, शालिनी पांडे, अंजली आनंद, जिशू सेनगुप्ता या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. २८ फेब्रुवारीला ही वेबसीरिज रिलीज होणार आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरनेटफ्लिक्सशबाना आझमी