२०२० साली कोरोना काळात अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूड हादरलं होतं. या प्रकरणात सुशांतसिंहची तेव्हाची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती अडकली होती. तिच्यावरच सुशांतला ड्रग देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप झाले होते. अनेक वर्ष रिया एनसीबीच्या चौकशी फेऱ्यात होती. यादरम्यान तिला काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला होत. काही महिन्यांपूर्वीच रियाला क्लीनचीट मिळाली. तर आता तब्बल ७ वर्षांनी रिया सिनेसृष्टीत परतली आहे.
काल नेटफ्लिक्सकडून आगामी बऱ्याच सिनेमा,सीरिजची घोषणा झाली. त्यातच एक 'फॅमिली बिझनेस' सीरिज आहे. यामध्ये अनिल कपूर आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. हा एक कॉर्पोरेट ड्रामा आहे जिथे कुटुंब आणि बिझनेसची कहाणी पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये रिया चक्रवर्तीचीही भूमिका आहे. कालच्या इव्हेंटमध्ये रियानेही इतर स्टारकास्टसोबत हजेरी लावली. गुलाबी रंगाच्या साडीत ती सुंदर दिसत होती. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सीरिजच्या स्टारकास्टमध्ये रियाला पाहून नेटकऱ्यांनी तिचं स्वागत केलं आहे. 'वेलकम बॅक रिया','रियाला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत','देर आये दुरुस्त आये..अभिनंदन रिया' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
या सीरिजमध्ये अनिल कपूर, विजय वर्मा, रिया चक्रवर्तीसोबतच नेहा धुपिया,आकाश खुराना, नंदिश संधू, रायमा सेन, ध्रुव सेहगल यांचीही भूमिका आहे.
Web Summary : Rhea Chakraborty returns to acting after a 7-year hiatus following the Sushant Singh Rajput case. She will be seen in Netflix's 'Family Business' alongside Anil Kapoor and Vijay Varma. Fans welcome her return to the screen.
Web Summary : सुशांत सिंह राजपूत मामले के बाद रिया चक्रवर्ती 7 साल के अंतराल के बाद अभिनय में वापसी कर रही हैं। वह अनिल कपूर और विजय वर्मा के साथ नेटफ्लिक्स के 'फैमिली बिजनेस' में दिखाई देंगी। प्रशंसक उनकी वापसी का स्वागत करते हैं।