Join us

RaanBaazaar : 'सतत काहीतरी...', अभिनेत्री प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:00 IST

RaanBaazaar : 'रानबाजार' वेबसीरिजमधील बोल्ड सीनमुळे प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत 'रानबाजार' (RaanBaazaar) या वेबसीरिजची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. यातील त्यांचा बोल्ड अंदाज खूप चर्चेत आला आहे. यामुळे वेबसीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळे प्राजक्ता माळीला ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो आहे.  मात्र नुकतेच प्राजक्ताने यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होताना दिसत आहे.

प्राजक्ता माळीने या वेबसीरिजचा टीझर शेअर करून लिहिले की, प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न. माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल अभिजित पानसे व मराठीतील सगळ्यात मोठी वेबसीरीज बनवल्याबद्दल प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर यांचे आभार.

तिने पुढे म्हटले की, १८ तारखेला रानबाजारचा ट्रेलर रिलीज झाला आहे. २०ला सीरिज रिलीज होतेय… #रानबाजार…. आतापर्यंत माझ्यावर व माझ्या कामांवर जसे प्रेम केलेत, जो पाठींबा दिलात; तसाच या ही वेबसीरिजला द्याल अशी आशा व्यक्त करते. तुमचीच प्राजक्ता… तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली असून ती व्हायरल होत आहे.

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या रानबाजार या वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली आहे. येत्या २० मे रोजी ‘रानबाजार’ वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट!

'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अ‍ॅप इन्स्टॉल करा आत्ताच!

अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx

आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS

टॅग्स :प्राजक्ता माळीतेजस्विनी पंडितरानबाजार वेबसीरिज