ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुपरहिट ठरलेली वेब सीरिज म्हणजे पंचायत. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही सीरिज विशेष लोकप्रिय ठरली. सध्या या सीरिजमध्ये सचिवची भूमिका साकारणारा अभिनेता विनोद सुर्यवंशी चर्चेत आला आहे. विनोदने जातीभेदावर भाष्य केलं असून आजही त्याच्या गावात त्यांना निम्न दर्जाची वागणूक दिली जाते असं थेट वक्तव्य त्याने केलं आहे.
अलिकडेच विनोदने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने जातीभेद, मंदिरात प्रवेश नाकारणे या सगळ्यावर उघडपणे भाष्य केलं. त्यांच्या गावातील एका मंदिरात आजही त्याला प्रवेश मिळत नाही, असं तो म्हणाला.
''कर्नाटकातील आमच्या एका गावात आजही जातीभेद केला जातो. त्या गावात दोन भाग आहेत एक उच्च जात आणि एक निम्न जात. यामध्ये दलितांचा भाग हा गावापासून वेगळा आहे'', असं विनोद म्हणाला.
पुढे तो म्हणतो, ''मी ७-८ वर्षांचा असतांना मी माझ्या वडिलांसोबत गावी गेलो होतो. तेव्हा आम्ही एका हॉटेलमध्ये जेवला. जेवण झाल्यावर आम्हाला आमची ताट स्वत:चं धुवून स्वच्छ करावी लागली होती. त्यावर मी वडिलांना असं का? असा प्रश्नही विचारला. तेव्हा, इथे असंच असतं. आपल्याला आपलं ताटही धुवावं लागेल आणि पैसेही द्यावे लागतील'', असं वडिलांनी सांगितलं.
मंदिरात आजही नाही प्रवेश
''आमच्या गावात असं एक मंदिर आहे जिथे आजही आम्हाला प्रवेश नाही. आजच्या घडीला सुद्धा आम्ही देवळाच्या बाहेरुन देवाचं दर्शन घेतो. आणि देवासाठी तेल किंवा नारळ जे काही आणलं असेल ते आम्हाला मंदिराबाहेर ठेवावं लागतं. त्यानंतर ते पुजारी देवळाच्या आत घेऊन जातात. पण, आम्हाला प्रवेश दिला जात नाही.''विनोदने लहानपणापासून हालाखीचे दिवस पाहिले आहेत. त्याचे वडील गवंडी काम करायचे तर आई घरकाम करायची. विनोद यांनी लिफ्टमॅन म्हणून पहिली नोकरी केली होती. त्यावेळी त्याला महिन्याला १६०० रुपये पगार मिळत होता. त्यानंतर त्याने एका कन्स्ट्रक्सन ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणूनही काम केलं होतं.
दरम्यान, विनोदने सगळ्या परिस्थितीवर मात करत कलाविश्वात पदार्पण केलं. आतापर्यंत त्याने पंचायत व्यतिरिक्त जानवर, थामा, सत्यमेव जयते, जॉली एलएलबी ३ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
Web Summary : Vinod Suryavanshi, known for 'Panchayat', revealed he still faces caste discrimination in his village. Denied temple entry and made to wash dishes as a child, he overcame hardship, working as a liftman before acting in films like 'Satyamev Jayate'.
Web Summary : 'पंचायत' के अभिनेता विनोद सूर्यवंशी ने खुलासा किया कि उन्हें अभी भी अपने गाँव में जातिवाद का सामना करना पड़ता है। मंदिर में प्रवेश से वंचित और बचपन में बर्तन धोने के लिए मजबूर, उन्होंने 'सत्यमेव जयते' जैसी फिल्मों में अभिनय करने से पहले एक लिफ्टमैन के रूप में काम किया।