Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पंचायत ४' रिलीज व्हायला अवघे काहीच तास बाकी! किती वाजता बघायला मिळेल सीरिज? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:50 IST

Panchayat Season 4 Streaming Time: 'पंचायत ४' वेबसीरिजची रिलीजची वेळ समोर आली आहे. रात्री उशीरा ही सीरिज रिलीज होणार आहे. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या

Panchayat 4 Release Time: 'पंचायत ४'ची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. या सीरिजचे याआधीचे तीन सीझन चांगलेच यशस्वी झाले आहेत. त्यामुळे 'पंचायत ४'ची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. 'पंचायत ४'चा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. इतकंच नव्हे आधी ही सीरिज जुलैमध्ये रिलीज होणार होती. ती आता एक आठवडा लवकर रिलीज होत आहे. 'पंचायत ४'च्या रिलीजला अवघे काहीच तास बाकी आहेत. अशातच 'पंचायत ४'च्या कधी रिलीज होणार, जाणून घ्या.

'पंचायत ४'चा रिलीज टाईम

'पंचायत ४' वेबसीरिज पाहण्यासाठी जगभरातील फॅन्स उत्सुक असतील यात शंका नाही. 'पंचायत ४'चा प्रीमिअर उद्या २४ जूनला प्राईम व्हिडीओवर होणार आहे. या सीझनचे एकूण ८ भाग असणार आहेत. ही सीरिज मंगळवारी रात्री उशीरा म्हणजेच १२ वाजता रिलीज होणार आहे. म्हणजेच २३ जून संपल्यावर २४ जूनच्या बरोबर १२ च्या ठोक्याला ही सीरिज प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. त्यामुळे ज्यांना 'पंचायत ४' पाहायची असेल त्यांना रात्री १२ पर्यंत जागावं लागेल. 'पंचायत ४'मध्ये सचिवजी अभिषेक त्रिपाठीच्या फुलेरा प्रवासाचा पुढचा आणि कदाचित शेवटचा अध्याय पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

'पंचायत ४'विषयी

'पंचायत' या वेबसीरिजचा पहिला सीझन लॉकडाऊनच्या काळात रिलीज झाला. ही सीरिज तुफान गाजली. इतकंच नव्हे तर 'पंचायत'चा पुढचा सीझन अर्थात 'पंचायत २'ची सुद्धा चांगलीच चर्चा झाली. गेल्या वर्षी 'पंचायत ३'रिलीज झाला. या सीरिजच्या शेवटी सचिवजी, विधायक, विकास, प्रल्हाद, भूषण या सर्वांना पोलिसांनी जेलमध्ये कैद केलं. याशिवाय गोळी लागल्याने प्रधानजी हॉस्पिटलमध्ये दिसले. आता 'पंचायत ४'मध्ये प्रधानजींना गोळी कोणी मारली? फुलेरा इलेक्शनमध्ये कोण बाजी मारणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील.

 

टॅग्स :वेबसीरिजबॉलिवूडटेलिव्हिजननीना गुप्ता