कलाविश्वात सध्या नव्या धाटणीच्या सिनेमांची, वेब सीरिजची निर्मिती केली जात आहे. या कलाकृतींमधून अनेक फिल्ममेकर्सने नवनवीन विषय हाताळल्याचं पाहायला मिळत आहे. यात अलिकडेच अमेझॉन प्राइम व्हिडीओवर मां का सम (Maa Ka Sum)ही सीरिज रिलीज झाली. या सीरिजमध्ये अभिनेत्री मोना सिंह महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. या सीरिजच्या निमित्ताने मोनाने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
''मी एका सैनिकी कुटुंबातली मुलगी आहे. त्यामुळे सोमवार असो वा रविवार शिस्त ही दररोज पाळलीच गेली पाहिजे. सकाळी ७ वाजता उठून सगळं आवरुन ९ वाजता ब्रेकफास्टसाठी टेबलवर हजर राहावं लागत होतं. होमवर्कसोबतच घोडेस्वारी, स्विमिंग करणं सुद्धा सक्तीचं होतं. पण, करिअर निवडण्याविषयी कोणतीही बंधन नव्हती. माझे कुटुंबीय पुढारलेल्या विचारांचे आहेत. त्यामुळे मला इंडस्ट्रीत काम करायचंय असं मी सांगितल्यावर त्यांनी माझ्या विचारांचा मान ठेवला. आणि, मला पुढे जायला पाठबळही दिलं'', असं मोना म्हणाली.
या मुलाखतीमध्ये मोनाला ओटीटीवर हाताळण्यात येणाऱ्या विषयांवर प्रश्न विचारला. ओटीटीवर कोणत्याही विषयावर कंटेन्ट करायची सूट असल्यामुळे स्पर्धा वाढतीये का? असा प्रश्न मोनाला विचारण्यात आला. त्यावर, ''जर स्पर्धा नसेल तर काही मज्जा नाही. गोष्टींमध्ये स्पर्धा हवीच. बेस्ट शो, स्टोरी, नवीन कलाकार हे आलेच पाहिजेत. ही इंडस्ट्रीच अशी आहे की जी दरवेळी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. ज्या कथेत आई मुलासाठी नाही, तर मुलगा आईसाठी जीवनसाथी शोधतो असं चित्र असतं. त्या कथेतून कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. आणि, मुळात आता आईविषयी असलेला जुना रुढीवाद आपल्याला कुठेतरी बदलायला हवा. स्त्रियांविषयी असलेल्या रुढीवादाची विचारसरणी आता आपल्यालाच तोडावी लागेल. एकल पालकत्व (सिंगल मदर) स्वीकारणाऱ्या स्त्रिला सुद्धा दुसरं लग्न करायचा अधिकार आहे. काळ बदलतोय, त्यामुळे आता समाजालाही त्याची विचारसरणी बदलायला हवी.''
दरम्यान, मोनाने केलेलं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चिलं जात आहे. तिच्या या विधानावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मोना इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मालिकांसह अनेक गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
Web Summary : Mona Singh advocates for changing societal views on single mothers. She emphasizes their right to remarry, challenging outdated stereotypes. She highlighted the importance of progressive thinking and breaking down traditional barriers.
Web Summary : मोना सिंह ने सिंगल मदर्स के बारे में सामाजिक दृष्टिकोण बदलने की वकालत की। उन्होंने पुनर्विवाह के उनके अधिकार पर जोर दिया, पुरानी रूढ़ियों को चुनौती दी। उन्होंने प्रगतिशील सोच और पारंपरिक बाधाओं को तोड़ने के महत्व पर प्रकाश डाला।