Join us

मनोज वाजपेयी आहेत 'या' मराठमोळ्या दिग्दर्शकाचे चाहते; म्हणाले, "अनेकदा काम मागितलं पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 16:20 IST

नेहमी या दिग्दर्शकाने मनोज वाजपेयींना काय उत्तर दिलं वाचा

अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) प्रभावशाली अभिनेते म्हणून ओळखले जातात. शाहरुख सलमान सारखं स्टारडम मिळवण्याच्या मागे न धावता त्यांनी वेगवेगळ्या भूमिकांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सिनेमा असो किंवा ओटीटी ते सगळीकडेच झळकले. त्यांची 'द फॅमिली मॅन' सीरिज प्रचंड गाजली. अशा या एक्स्ट्रा ऑर्डिनरी अभिनेत्याला एका मराठी दिग्दर्शकासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. अनेकदा मनोज वाजपेयींनी त्या दिग्दर्शकाकडे कामही मागितलं आहे.

अमेझॉन प्राईमने नुकतंच आगामी तब्बल 70 प्रोजेक्ट्सची घोषणा केली. यामध्ये सर्वात चर्चेतील वेबसीरिज 'पाताल लोक'चाही समावेश आहे. या सीरिजचा पुढचा भाग लवकरच रिलीज होणार आहे. ही सीरिज मराठमोळ्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केली आहे. तो म्हणजे 'किल्ला' फेम दिग्दर्शक अविनाश अरुण (Avinash Arun). मनोज वाजपेयी  हे देखील अविनाश अरुणच्या कामाचे चाहते आहेत. त्याच्यासोबत काम करण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत. अमेझॉनच्या इव्हेंटममध्ये मनोज वाजपेयी म्हणाले, 'मी या दिग्दर्शकाचा मोठा चाहता आहे. स्ट्रगल तर माझ्या नशीबातच होता. आजही मी मला जे हवंय त्यासाठी स्ट्रगल करतो. ज्या दिग्दर्शकासोबत काम करायचंय त्याच्याकडे काम मागतो."

ते पुढे म्हणाले, "मी याला पृथ्वी थिएटरमध्ये भेटलो होतो तेव्हा बोललो. नंतर आम्ही अंधेरीत भेटलो तेव्हाही काम मागितलं. इतकंच काय न्यूयॉर्कमधील फूटपाथवरही मी त्याच्याकडे काम मागितलं आहे. पण दरवेळेस अविनाशकडून पाहुया सर, बोलूयात यावर असाच रिप्लाय येतो. आता तरी त्याने मला कन्फर्म सांगावं अशी माझी इच्छा आहे."

अविनाश अरुण टॅलेंटेड दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याने 'किल्ला' हा मराठीसिनेमा दिग्दर्शित केला. यानंतर नुकताच त्याचा 'थ्री ऑफ अस' हा हिंदी सिनेमा आला ज्याची खूप प्रशंसा झाली.

मनोज वाजपेयी 'फॅमिली मॅन'सीरिजच्या पुढच्या भागासाठी या इव्हेंटमध्ये आले होते. तेव्हा स्टेजवर त्यांनी 'पाताल लोक' सीरिजच्या स्टारकास्टसोबत गप्पा मारल्या. जयदीप अहलावत यांनी पाताल लोकमध्ये 'हाथीराम चौधरी'ची भूमिका साकारली आहे. फॅमिली मॅनचा श्रीकामत तिवारी आणइ हाथीराम चौधरी एकत्र येऊ शकतात का असाही प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा जयदीप यांनीही सहमती दर्शवलीय

टॅग्स :मनोज वाजपेयीसेलिब्रिटीमराठीसिनेमा