Join us
Daily Top 2Weekly Top 5

आतुरता संपली! 'Kota Factory'च्या तिसऱ्या सीझनची तारीख जाहीर, कधी आणि कुठे पाहता येणार सीरिज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 14:34 IST

जितेंद्र कुमारची नवीन सीरिज 'कोटा फॅक्टरी 3'ची रीलिज डेट जाहीर करण्यात आली आहे.

अभिनेता जितेंद्र कुमार सध्या चर्चेत आहे. प्रत्येकाच्या ओठावर त्याचंच नाव आहे. जितेंद्र कुमारची प्रमुख भूमिका असलेली 'पंचायत 3' ही वेबसीरिज नुकतेच प्रदर्शित झाली. जितेंद्र कुमारने सीरिजमध्ये साकारलेली सचिवजींची भूमिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. आता 'पंचायत 3' ची चर्चा असतानाच जितेंद्र कुमारची नवीन सीरिज 'कोटा फॅक्टरी 3'ची रीलिज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जितेंद्र कुमारचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. 

 'कोटा फॅक्टरी 3' च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. जितेंद्र पुन्हा एकदा जितू भय्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 'कोटा फॅक्टरी' सीरिजचे  याआधीचे दोन्ही सीझन चांगलेच गाजले. 2019 साली कोटा फॅक्ट्री चा पहिला सिझन टीव्हीएफ(TVF) आणि नंतर युट्यूबवरही आला होता. या सीरिजच्या दोन्ही सीझनने तरुणांचं मन जिंकलं. सीरिजचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याबद्दल अपेडट आलं आहे. 

 जितेंद्र कुमारची 'कोटा फॅक्टरी 3' ही सीरिज येत्या 20 जुनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.  नेटफ्लिक्स इंडियाने अधिकृत ट्विटर हँडलवर सीझन 3 ची अधिकृत घोषणा केली आहे. याचं कॅप्शन असं की, "आजपासून तयारी सुरू, 'कोटा फॅक्टरी 3' येत्या 20 जूनला नेटफ्लिक्सवर". घोषणा होताच चाहते सीरिजसाठी उत्सुक झाले आहेत. वेबसिरिजमधल्या पात्रांची प्रेक्षकांच्या मनावर छाप आहे. या वेबसिरिजमधलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलंस वाटतं.

राजस्थानच्या कोटा शहरात दरवर्षी लाखो विद्यार्थी शिकतात. आयआयटी जेईई या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या परिस्थितीतून जावं लागतं याची कहाणी सांगणारी ही सीरिज आहे. यामध्ये जितेंद्र कुमार प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय या सीझनमध्ये अभिनेत्री तिलोत्तमा शोमे झळकणार आहे. तसेच मयुर मोरे, एहसास छन्ना, आलम खान, रंजन राज हे कलाकार पाहायला मिळतील. दोन्ही सीझनमधील जितेंद्रच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. या तिसऱ्या सिझनमध्येही 'जितू भैय्या'चांगलांच भाव खाऊन जाईल, यात शंका नाही. 

टॅग्स :नेटफ्लिक्ससेलिब्रिटीबॉलिवूड