Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पंचायत ४' कधी रिलीज होणार? जितूने 'आयफा' पुरस्कार सोहळ्यात केला खुलासा; म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:30 IST

'पंचायत ४'विषयी सचिवजी अर्थात जितेंद्र कुमारने मोठा खुलासा केला असून काय म्हणाला बघा (panchayat)

'पंचायत' ही (panchayat) वेबसीरिज चांगलीच गाजली. 'पंचायत'चे तीनही सीझन लोकांच्या पसंतीस उतरले. जितेंद्र कुमार, (jitendra kumar) नीना गुप्ता, रघुवीर यादव यांनी 'पंचायत'चे तीनही सीझन त्यांच्या अभिनयामुळे सुपरहिट केले. आता सर्वांना उत्सुकता आहे 'पंचायत ४'ची. शनिवारी ८ फेब्रुवारीला आयफा डिजीटल पुरस्कार संपन्न झाले. या पुरस्कार सोहळ्यात जितेंद्र कुमारने 'पंचायत ४'विषयी मोठी अपडेट लोकांसमोर आणली.'पंचायत ४'विषयी जितू काय म्हणालाआयफा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगरीत 'पंचायत' वेबसीरिजसाठीजितेंद्र कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याच पुरस्कार सोहळ्यात जितेंद्रला 'पंचायत ४'विषयी विचारलं असता तो म्हणाला की, "शूटिंग नुकतंच झालं आहे. सध्या पंचायतच्या चौथ्या सीझनचं पुढील काम सुरु आहे. मला आशा आहे की लवकरच ही वेबसीरिज लोकांच्या भेटीला येईल."अशा शब्दात जीतूने 'पंचायत ४'विषयी अपडेट दिली. याशिवाय जितूने आयफा पुरस्कार सोहळ्याविषयी भाष्य केलंय. जीतू म्हणाला की, "मी जिथून येतो अशा राजस्थानमध्ये आयफा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन होणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. जयपूरचे लोक हिऱ्यासारखे आहेत. ही माणसं कलाकारांना कायमच भरभरुन प्रेम देत आले आहेत." 'पंचायत ४'मध्ये जितेंद्र कुमारची प्रमुख भूमिका असून सर्वांना वेबसीरिजची उत्सुकता आहे.

टॅग्स :वेबसीरिजबॉलिवूड