Join us
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र कुमार की नीना गुप्ता ? 'पंचायत 3'साठी कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन, अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 16:24 IST

'पंचायत' सीरिजचे तिन्ही सीझन हीट झाले आहेत.

Panchayat Season 3 Cast Fees : 'पंचायत' (Panchayat) या लोकप्रिय सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तीन्ही सीझन चांगलेच हिट झाले आहेत.  तरुणांना ही सीरिज खूप आवडत आहे. 'पंचायत'मधील पात्रांमध्ये प्रेक्षक स्वत:ला पाहत आहेत. या सीरिजमधील जितेंद्र कुमारने  चाहत्यांना वेड लावलं आहे. 'पंचायत' या सीरिजमध्ये जितेंद्र कुमारने (Jitendra Kumar) सचिवजीची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर या सीरिजसाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं, याची चर्चा सुरु आहे. 

'पंचायत' सीरिजमध्ये सचिवाची भूमिका साकारणाऱ्या जितेंद्र कुमार याने सर्वाधिक फी घेतल्याचं बोललं जात आहे. त्याचं मानधन हे बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताहून अधिक असल्याची चर्चा आहे. दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, जितेंद्र कुमारला प्रत्येक एपिसोडसाठी 70 हजार रुपये मिळाले आहेत.  तिसऱ्या सीझनच्या एकूण एपिसोड्ससाठी त्याला  5.6 लाख रुपये मिळाले, तर नीना गुप्ता यांना प्रति एपिसोड 50 हजार मानधन मिळालं आहे. अद्याप अभिनेत्याने आणि निर्मात्यांनी किती मानधन घेतलंय याबद्दल जाहीर माहिती दिलेली नाही.

 

दरम्यान जितेंद्र कुमारने मानधनाच्या चर्चांवर संताप व्यक्त केला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, 'पंचायत 3'चे अभिषेक त्रिपाठी उर्फ ​​जितेंद्र कुमारने मानधनाबाबत सुरू असलेल्या चर्चांबद्दल म्हटलं, "मला वाटते की एखाद्याच्या पगाराबद्दल आणि आर्थिक गोष्टींबद्दल चर्चा करणे योग्य नाही. अशा चर्चांमधून काहीच चांगले होत नाही. ते फलदायी सुद्धा नाही. त्यामुळे अशा अफवांमध्ये पडणे टाळावे असे मला वाटते'.

'पंचायत 3' हिट झाल्यानंतर जितेंद्र कुमार आता त्याच्या पुढच्या बहुप्रतिक्षित 'कोटा फॅक्टरी' सीरिजच्या तिसरा सीझनसाठी सज्ज झाला आहे. या सीरिजचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. ही सीरिज येत्या 20 जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. 'कोटा फॅक्ट्री 3' ही ब्लॅक अॅन्ड व्हाइट सीरिज विद्यार्थांच्या अवतीभोवती फिरते.  आता पुन्हा एकदा आपल्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी जितू भैया सज्ज आहे. प्रतीश मेहताने 'कोटा फॅक्ट्री 3' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

टॅग्स :नीना गुप्तासेलिब्रिटीबॉलिवूड