Join us

२०२४ च्या अखेरीस मनोरंजनाची बरसात! डिसेंबरमध्ये OTT वर हे सिनेमे अन् वेबसीरिज होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 11:32 IST

२०२४ च्या शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये हे सिनेमे अन वेबसीरिज होणार आहेत रिलीज

२०२४ वर्ष काहीच दिवसात संंपेल. नवीन वर्ष अर्थात २०२५ मध्ये अनेक बॉलिवूड सिनेमे रिलीजसाठी सज्ज आहेत. पण त्याआधी २०२४ मध्ये दर्दी सिनेप्रेमींना घरबसल्या वर्षाअखेरीस अनेक सिनेमे अन् वेबसीरिज बघता येणार आहेत. ओटीटीवर डिसेंबरमध्ये अनेक वेबसीरिज अन् नवीन सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. याची संपूर्ण लिस्ट समोर आली असून २०२४ च्या अखेरीस मनोरंजनाची बरसात होईल, यात शंका नाही. बघा कोणते सिनेमे अन् होणार रिलीज.

हे सिनेमे अन् वेबसीरिज ओटीटी रिलीजसाठी सज्ज

  1. जिगरा: अभिनेत्री आलिया भटचा यावर्षी रिलीज झालेला सिनेमा म्हणजे 'जिगरा'. भावा-बहिणीच्या नात्यावर हा सिनेमा आधारीत होता. हा सिनेमा थिएटरमध्ये इतका चालला नाही. आता  ६ डिसेंबरला 'जिगरा' ओटीटी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
  2. अग्नी: फरहान अख्तर निर्मित 'अग्नी' सिनेमात अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची करुण कहाणी दिसणार आहे. हा सिनेमा ६ डिसेंबरला प्राइम व्हिडीओवर रिलीज होतोय. जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, द्विवेंदू शर्मा, प्रतीक गांधी या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे.
  3. अमरन: साई पल्लवी आणि अभिनेता शिवकार्तिकेयन यांचा सत्य घटनेवर आधारीत सिनेमा म्हणजे 'अमरन'. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. ५ डिसेंबरला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.
  4. माईरी: मराठमोळी अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेता चिन्मय मांडलेकर, सई देवधर या मराठी कलाकारांची भूमिका असलेला 'माईरी' सिनेमा ६ डिसेंबरला ओटीटीवर रिलीज होणार आहे.
  5. तनाव सीझन 2: सोनी लिव्हवर गाजलेली वेबसीरिज म्हणजे 'तनाव' याच गाजलेल्या वेबसीरिजचा पुढील सीझन अर्थात 'तनाव सीझन 2' रिलीजसाठी सज्ज आहे. कबीर बेदी, मानव वीज,  रजत कपूर या कलाकारांची वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहे. ६ डिसेंबरला ही सीरिज सोनी लिव्हवर रिलीज होईल

 

टॅग्स :वेबसीरिजबॉलिवूडआलिया भट