Sayani Gupta: ओटीटी विश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे सयानी गुप्ताकडे (Sayani Gupta) पाहिलं जातं. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिज 'फोर मोअर शॉट्स प्लीज' मुळे अभिनेत्री सयानी गुप्ता प्रसिद्धीझोतात आली. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या इंटिमेट सीन्सवर भाष्य केलं आहे.
अभिनेत्री सयानी गुप्ताने 'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीत वेब सीरिजचं शूट करताना तिला आलेला विचित्र अनुभव तिने शेअर केला आहे. या मुलाखतीत ती म्हणाली, "बरेच लोक इंटिमेट सीन्सचा फायदा उचलतात. माझ्यासोबतही अशीच एक विचित्र घटना घडली, जेव्हा शूट करत असताना दिग्दर्शकाने कट म्हणूनही तो को-स्टार मला किस करत राहिला. कोणत्याही कलाकाराला असं वागणं शोभत नाही."
पुढे अभिनेत्री गोवा शूटचा किस्सा शेअर करत म्हणाली, "जेव्हा आम्ही गोवामध्ये 'फोर मोअर शॉर्ट्स प्लीज' च्या पहिल्या सीझनचं शूट करत होतो. तेव्हा मला एक सीन शूट करताना अवघडल्यासारखं वाटतं होतं. त्यावेळी एका छोट्या ड्रेसमध्ये मला समुद्रकिनारी वाळूवर झोपावं लागलं. शिवाय त्यदरम्यान, माझ्यासमोर जवळपास ७० लोक उभे होते. त्यावेळेस देखील मला खूपच असुरक्षित वाटत होतं." असा खुलासा अभिनेत्रीने केला.