Join us

आर्यन खान कॅमेऱ्यासमोर कधीच हसत का नाही? राघव जुयाल म्हणाला, "त्याला अ‍ॅटिट्यूड..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:12 IST

आर्यन खान मित्रांमध्ये कसा असतो? राघव जुयालने सगळंच सांगितलं

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'  (Baads of Bollywood) सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा तो दिग्दर्शक आहे. आर्यनने अभिनयात नाही तर दिग्दर्शनात पदार्पण करण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्काच बसला होता. काही दिवसांपूर्वी सीरिजचा ट्रेलर आला आणि सर्वांना आवडला. काही वर्षांपूर्वी आर्यन खान अनेक कारणांमुळे चर्चेत होता. ड्रग्सप्रकरणी त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. नंतर त्याची सुटका झाली. आर्यन अचानक लाईमलाईटमध्ये आला. मात्र तो कधीच माध्यमांसमोर फारसा हसताना दिसला नाही. आर्यन कधीच हसत नाही का? यावर आता अभिनेता आणि डान्सर राघव जुयालने (Raghav Juyal)  उत्तर दिलं आहे.

आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजमध्ये लक्ष्य लालवानी आणि राघव जुयाल यांची मुख्य भूमिका आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत राघव जुयाल आर्यनविषयी म्हणाला, "आर्यनला कॅमेऱ्यासमोर हसण्याची भीती वाटते. तो कधीच पापाराझींसमोर हसत नाही. त्याला अॅटिट्यूडमध्ये राहायला आवडतं. पण आमच्यासोबत असताना तो एकदम मजेत असतो, हसत असतो. मुलं मुलं जसे मजा करतात तसाच तोही करतो. त्याच्यात एक लहान मुलात असते तशी एनर्जी आहे. पण कॅमेऱ्यासमोर तो वेगळा असतो जे मला आवडतं आणि कदाचित मुलींनाही तसंच आवडतं."

तो पुढे म्हणाला, "मी एकदा आर्यनला म्हणालो की एक दिवस मी तुला कॅमेऱ्यासमोर नक्की हसवणार. तेव्हा तो म्हणाला, 'नको नको भावा असं नको करु'. त्यानंतर तो जेव्हा केव्हाही मला भेटतो मी त्याला हेच म्हणतो की मी तुला नक्की हसवणार."

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'सीरिज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. बॉलिवूडमधलं डार्क सीक्रेट यामध्ये बघायला मिळणार आहे. शाहरुख-सलमान आणि आमिर तिघांनीही सीरिजमध्ये कॅमिओ केला आहे.

टॅग्स :आर्यन खानबॉलिवूड