Join us

जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 09:49 IST

'बादशाह'च्या लेकासाठी सगळेच सरसावले, आर्यन खान दिग्दर्शित पहिलीच सीरिज हिट होणार?

Baads of bollywood: बॉलिवूड म्हटलं की तीन खानची चर्चा असतेच. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिघांचा वेगळा स्वॅग आहे. प्रत्येकाने इंडस्ट्रीत आपल्या वेगळ्या शैलीसह वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसंच या तिघांनीही ९० च्या दशकात मागे पुढेच करिअरची सुरुवात केली. आजपर्यंत काही सिनेमांमध्ये दोन खान एकत्र दिसले आहेत. मात्र तिघांना एकाच सिनेमात आणण्याची किमया कोणाही निर्माता, दिग्दर्शकाला करता आली नव्हती. पण आता ती आर्यन खानने केली आहे. शाहरुख, सलमान आणि आमिर तिघांचे वेगवेगळे सीन्स का होईना पण एकाच सीरिजमध्ये हे तिघेही दिसणार आहेत.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजची जोरदार चर्चा आहे. बॉलिवूडचं डार्क चित्र या सीरिजमध्ये बघायला मिळणार आहे. नुकताच सीरिजचा ट्रेलरही आला. लक्ष्य आणि राघव या सीरिजमध्ये मुख्य कलाकार आहेत. सीरिजच्या टीझरमध्ये सलमान खानची झलक दिसली होती. तर आता ट्रेलरमध्ये आमिर खानचीही झलक दिसली आहे. अभिनेता लक्ष्यसोबत त्याचा कॉमेडी सीन पाहायला मिळत आहे. तर ट्रेलरच्या शेवटी शाहरुख खानची 'बादशाह' म्हणून एन्ट्री होते. त्यातही त्याचा ह्युमर दिसत आहे. 

'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही आर्यन खानची पहिलीच सीरिज आहे. यातून तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये त्याने तीनही खानसह करण जोहर, बॉबी देओल, मोना सिंग, सेहर लांबा, मनोज पाहवा अशा अनेक कलाकारांना घेतलं आहे. १८ सप्टेंबर रोजी सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 

टॅग्स :आर्यन खानबॉलिवूडवेबसीरिज