Join us

'वॅार २'मध्ये 'या' दोन अभिनेत्रींची स्पेशल एन्ट्री? जाणून घ्या कोण आहेत 'त्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:48 IST

'वॅार २'मध्ये सिनेमात आलिया भट आणि शर्वरी वाघ यांची स्पेशल एन्ट्री होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यशराज फिल्म्सचा बहुचर्चित अ‍ॅक्शन ड्रामा 'वॅार २' सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.  यामध्ये पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर हे दोन दिग्गज कलाकार एकत्र झळकणार आहेत. आता या चित्रपटाबाबत आणखी एक मोठं अपडेट समोर आलं आहे. ते म्हणजे या अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमात आलिया भट आणि शर्वरी वाघ यांची स्पेशल एन्ट्री होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यशराज फिल्म्सच्या 'वॅार २'मधील पोस्ट क्रेडीट दृश्यांमध्ये आलिया-शर्वरी दिसू शकतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि वरुण धवन यांचाही कॅमिओ असेल अशी माहितीही यापूर्वी आली होती.  आलिया भट आणि शर्वरी यांना यापूर्वी कधीच एकत्र पाहिलं गेलेलं नाही, त्यामुळे 'वॅार २'मध्ये त्यांची भूमिका काय असणार, याबाबत रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.  वाईआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या 'अल्फा' या आगामी ॲक्शनपटात आलिया भट आणि शर्वरी दिसणार आहेत. त्यामुळे  'अल्फा' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांच्या पात्रांची झलक 'वॅार २'मध्ये पाहायला मिळेल. 

'वॉर २' चे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत असून हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'वॉर २' हा सिनेमा २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'वॉर' या चित्रपटाचा सीक्वल असणार आहे. एकूण २०० कोटींचं बजेट असलेल्या 'वॉर २' सिनेमासाठी हृतिकने जवळपास ४८ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. 'वॉर २'मधून ज्युनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 'वॉर २'साठी त्याने ३० कोटी रुपये फी आकारली आहे. 'वॉर २'मध्ये कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. या सिनेमासाठी तिने १५ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

 

टॅग्स :आलिया भटहृतिक रोशनज्युनिअर एनटीआर