Join us
Daily Top 2Weekly Top 5

इरफान खानच्या शेजारीच वाजिद खानचा पार पडला दफनविधी, पहा फोटो व व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 14:19 IST

वाजिद खानच्या पार्थिवावर वर्सोवा दफनभूमीत पार पडले अंत्यसंस्कार

बॉलिवूडची प्रसिद्ध गायक व म्युझिक कंपोझर वाजिद खानने वयाच्या 42व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याचे रविवारी किडनी आणि कोरोनाच्या आजारामुळे निधन झाले. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार वाजिद खानच्या पार्थिवावर आज सकाळी वर्सोवा येथील दफनभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. 

वाजिद खानच्या अंतिम दर्शनावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायर होत आहेत. यात त्याचा भाऊ साजिद खानदेखील दिसतो आहे. त्याच्या अंतिम संस्कारावेळचे काही फोटो व व्हिडिओ विरल भयानीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यावेळी साजिद खानसोबत वाजिद खानची पत्नी व मुलेही उपस्थित होते.

वाजिद खानचे निधन किडनीच्या आजारामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.

तो चेंबूर येथील सुराना सेतिया हॉस्पिटलमध्ये जवळपास दोन महिन्यांपासून दाखल होता. या उपचारादरम्यान त्याची कोरोना टेस्टदेखील पॉझिटिव्ह आली होती.

मागील एक आठवड्यापासून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :वाजिदसाजिद खान