Join us
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री म्हणजे घरी बसायचं असं त्यांना कोणी सांगितलंय का?, अमित शहांवर विशाल दादलानीने साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 12:44 IST

प्रसिद्ध संगीतकार व गायक विशाल दादलानीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.  

प्रसिद्ध संगीतकार व गायक विशाल दादलानी सोशल मीडियावर त्याची आजूबाजूच्या घडामोंडीवर आपले मत बेधडकपणे मांडत असतो. त्यामुळे बऱ्याचदा त्याला ट्रोलही केले जाते. नुकतेच त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. त्याने गृहमंत्री म्हणजे त्यांनी घरीच बसायचे असे अमित शहा यांना कोणी सांगितले आहे का, असा खोचक सवाल केला आहे.  कोरोना व्हायरसचे संकट देशासमोर असताना ते अजूनही शांत  का आहेत असा सवाल करीत विशालने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.विशाल दादलानीने ट्विट केलंय की, खरंच, गृहमंत्री म्हणजे त्यांनी घरीच बसायचं असं अमित शाह यांना कोणी सांगितलंय का? देशात इतक्या समस्या असताना आपल्याला अदृश्य गृहमंत्री लाभले आहेत. मीडियादेखील त्यांना काहीच प्रश्न विचारत नाहीत.

यापूर्वी 14 मार्चला मुंबईतील वांद्रे स्टेशनवर हजारोंच्या संख्येने प्रवासी कामगारांनी गर्दी केली होती. याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मुद्द्याला धार्मिक रंगदेखील देण्यात आला होता.

याप्रकरणावर देखील विशाल दादलानीने आपले मत व्हिडिओच्या माध्यमातून मांडले आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तबलिगी मरकज प्रकरणावरही विशाल दादलानीने आपले मत व्यक्त केले होते.  

टॅग्स :विशाल ददलानीअमित शाह