Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीने राहुल वैद्यला केलं इन्स्टाग्रामवर ब्लॉक, मराठमोळा गायक म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:00 IST

सोशल मीडियावर राहुलचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राहुल वैद्य हे आता छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. हा गायक 'बिग बॉस', 'लाफ्टर शेफ' सारख्या अनेक शोमध्ये दिसला आहे. त्याचा एक मोठा चाहतावर्ग आहे. तो कायम चर्चेतही असतो. अशातच आता त्यानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  राहुल वैद्यनं भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसंदर्भात एक खुलासा केलाय. विराट कोहलीने त्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं दावा  राहुल वैद्यने केला आहे. 

सोशल मीडियावर राहुलचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राहुल वैद्य पापाराझींशी बोलताना म्हणाला, "माहित नाही का पण विराट भाईने मला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे. मला आजपर्यंत समजलं नाही की, त्यांनी मला का ब्लॉक केलं आहे. ते भारतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेत. पण माहित नाही का मला त्यांनी ब्लॉक केलं आहे. कदाचित काहीतरी घडलं असेल".

राहुल वैद्य 'इंडियन आयडॉल' आणि 'बिग बॉस 14' (उपविजेता) साठी चर्चेत आहे. राहुलने 2021 मध्ये अभिनेत्री  दिशा परमार हिच्याशी लग्न केलं. राहुल वैद्य आणि दिशा परमार यांना एक मुलगी आहे. तिचा जन्म 20 सप्टेंबर 2023 रोजी झाला. तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अलीकडेच 11 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला. विराट आणि अनुष्का अनेक दिवसांपासून आपल्या दोन मुलांसह लंडनमध्ये राहत आहेत. दोघेही कायमस्वरूपी लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या विचार करत असल्याचं बोललं जात आहे.

टॅग्स :राहुल वैद्यविराट कोहलीइन्स्टाग्राम