क्रिकेटपटू विराट कोहली (Virat kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे अनेकांचं लाडकं कपल आहे. दोघंही जिथे जातात तिथे त्यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी होते. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका संपल्यानंतर खेळाडू घरी परतले आहेत. दरम्यान विराट आणि अनुष्काही मुंबईत आले आहेत. आज सकाळीच ते गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने अलिबागला रवाना झाले. दोघंही जेट्टीजवळ उभे असताना तेव्हा आजूबाजूच्या लोकांना सुरुवातीला काहीच कळलं नाही की आपल्यासमोर हे सेलिब्रिटी कपल आहे. विरुष्का च्या मागे उभ्या असलेल्या एका मुलीची रिअॅक्शन आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट आणि अनुष्का आज गेट ऑफ इंडिया येथे आले असता अगदी सामान्यांप्रमाणेच ते आपल्या बोटीची वाट पाहत होते. पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कॅप्चर केले. विराट यावेळी ब्लॅक कॅज्युअल वेअरमध्ये दिसला. तर अनुष्काने व्हाईट टॉप, निळे जॅकेट आणि ब्लॅक शॉर्ट्स घातली होती. सामान्य लोकांच्या मधूनच ते गेट वे ऑफ इंडियाजवळ बोटी लागतात तिथे आले. तिथे दोघंही गप्पा मारत बोटीची वाट पाहत उभे होते. तेव्हा आजूबाजूच्या लोकांना सुरुवातीला समजलंच नाही की समोर विराट-अनुष्का आहेत. नंतर कळल्यावर प्रत्येकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली. यावेळी विराट - अनुष्काच्या मागे उभ्या असलेल्या कपलची रिअॅक्शन फारच भारी होती. त्या मुलीला समोर अनुष्का आहे हे कळल्यावर ती आ वासून बघत राहिली. तिच्या चेहऱ्यावर नंतर हसू आलं. सोशल मीडियावर सध्या याच मुलीची चर्चा आहे.
व्हिडिओच्या कमेंट्समध्येही सगळे फक्त त्या कपलच्याच रिअॅक्शन बद्दल बोलत आहेत. 'असा क्षण माझ्यासोबत कधी येणार' अशीही कमेंट एकाने केली आहे. तिथे उभे असलेले सर्व लोक नशिबवानच होते ज्यांना विराटची झलक पाहायला मिळाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.