Join us

महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसाचं मेकअप करून पालटलं रुपडं, लूक पाहून नेटकरी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:54 IST

Viral Girl Monalisa: महाकुंभमधून व्हायरल झालेली मोनालिसा सतत चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर रील्स शेअर करत असते आणि अनेक कार्यक्रमांमध्येही दिसते.

महाकुंभमधून व्हायरल झालेली मोनालिसा सतत चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर रील्स शेअर करत असते आणि अनेक कार्यक्रमांमध्येही दिसते. जर तुम्ही मोनालिसाचा महाकुंभमधला आणि आताचा लूक पाहिला तर तुम्ही चकीत व्हाल. कारण तिचा संपूर्ण लूक बदलला आहे. मोनालिसाचा मेकअप करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि हा व्हिडीओ पाहून तिचे काही चाहते संतापले आहेत. तर काहींना तिचा लूक आवडला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये मोनालिसा मेकअप करताना दिसत आहे. तिच्या चेहरा खूप जास्त पांढरा करून मेकअप करण्यात आला आहे. त्यामुळे तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. केसांपासून ते चेहऱ्यापर्यंत सगळा लूक बदलला आहे. तिच्या केसांचे कर्ल्स केले आहेत आणि तिने लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तीन लोकांनी मोनालिसाचा मेकओव्हर केला आहे.

नेटकऱ्यांना नाही आवडला मोनालिसाचा मेकओव्हरलोकांना मोनालिसाला साध्या लूकमध्ये पाहायला आवडते. एका युजरने लिहिले की, जग आपल्या कमतरता लपवते पण ही तर तिचे सौंदर्य लपवत आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, तुम्ही कितीही मेकअप केला तरी तुम्ही तसेच दिसाल. काही लोकांना तिचा लूक खूप आवडला आहे. एकाने लिहिले की, खूप सुंदर, तर दुसऱ्याने खूप हार्ट इमोजी शेअर केले आहेत. मोनालिसाचे रोज नवीन व्हिडिओ व्हायरल होत राहतात. बऱ्याच वेळा तिचे फेक व्हिडीओही समोर येतात. मोनालिसा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

टॅग्स :कुंभ मेळाव्हायरल व्हिडिओप्रयागराज