Join us

'हरलोय असं वाटतं'; वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 15:35 IST

Riteish deshmukh: रितेशतची ही पोस्ट वाचल्यावर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं आहे.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज जयंती. त्यानिमित्ताने अभिनेता रितेश देशमुख (Riteish deshmukh) यांनी वडिलांच्या आठवणीत भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट वाचल्यावर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं आहे. या पोस्टमध्ये त्याने वडिलांविषयी भाष्य करत त्यांच्यासोबत त्याच्या मुलांचे फोटोही शेअर केले आहेत.

काय आहे रितेशची पोस्ट?

''माझ्या खडतर काळात मला जेव्हा उदास वाटतं, काहीच करता येणार नाही असं वाटतं. किंवा हरलोय असं वाटतं त्यावेळी मी विचार करतो की मी कोणाचा मुलगा आहे?.. या एका विचाराने मी पुन्हा एकदा जग जिंकण्यासाठी तयार होतो. वाढदिवसाच्या  खूप शुभेच्छा बाबा, अशी पोस्ट रितेशने केली आहे.

दरम्यान, या पोस्टमध्ये त्याने रिआन आणि राहील या त्याच्या मुलांचे दोन फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो लातूरमधील विलासराव यांच्या स्मारकातील आहेत. या ठिकाणी रिआन आणि राहीलच्या मागे विलासराव देशमुखांचा पूर्णाकृती पुतळा उभा असल्याचं पाहायला मिळतं. रितेशसोबत जेनेलियानेदेखील विलासराव देशमुख यांच्या आठवणीत पोस्ट शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखसेलिब्रिटीसिनेमा