Join us

अभिनयातून संन्यास घेतलेल्या विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' बघणार PM नरेंद्र मोदी, संसद भवनात होणार स्पेशल स्क्रिनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 13:27 IST

विक्रांतने बॉलिवूडमधून संन्यास घेतल्याची घोषणा केली. तर दुसरीकडे त्याच्या 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं संसद भवनात स्पेशल स्क्रिनिंग होणार असल्याचं समजत आहे.

12th Fail फेम बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनयातून संन्यास घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत विक्रांतने बॉलिवूडमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. अलिकडेच त्याचा 'द साबरमती रिपोर्ट' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमामुळे चर्चेत असतानाच विक्रांतने निवृत्ती घेतल्याचं सांगितलं. 

विक्रांतने बॉलिवूडमधून संन्यास घेतल्याची घोषणा केली. तर दुसरीकडे त्याच्या 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं संसद भवनात स्पेशल स्क्रिनिंग होणार असल्याचं समजत आहे. २ डिसेंबर(सोमवारी) संध्याकाळी ७ वाजता 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग संसद भवन परिसरात केलं जाणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील उपस्थित राहणार आहेत. 

'द साबरमती रिपोर्ट' हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. या सिनेमातून २००२ साली गुजरातमधील गोधरा येथे जाळण्यात आलेल्या साबरमती एक्सप्रेस या ट्रेनच्या घटनेवर भाष्य करण्यात आलं आहे. १५ नोव्हेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमात विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत असून त्याने एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. तर राशी खन्ना, रिद्धी डोंगरा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :विक्रांत मेसीनरेंद्र मोदीसेलिब्रिटी