Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vikram Gokhale Health Update : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात व्हेंटिलेटरही काढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 11:41 IST

विक्रम गोखले गेल्या ४८ तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ११ वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी  माहिती मिळत आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या ४८ तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ११ वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी  माहिती मिळत आहे.

'विक्रम गोखले हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत व हातपाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघत असून त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे,' अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याटगिकर यांनी दिली आहे. 

 

गेल्या ४८ तासांपासून विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. आता ते उपचारांना प्रतिसादही देत आहेत. 

टॅग्स :विक्रम गोखलेहॉस्पिटलपुणे